मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि हिंदुह्दयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं आज निधन झालं. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनांची बातमी संपता ना संपता लगेचच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. संजीवनी करंदीकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
“औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं, जे भक्त आहेत त्यांना..;” राऊतांचा अकबरूद्दीन ओवेसीला इशारा
संजीवनी करंदीकर या आमच्या आत्या होत्याच, पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या व शिवसेना प्रमुखांच्या भगिनी होत्या. त्यांना एक समृद्ध वारसा लाभला. त्यांनी तो वारसा शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवाही निखळला. संजू आत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. प्रबोधनकारांप्रमाणेच त्या परखड होत्या. वाचनाचा छंदही त्यांना अफाट होता. प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”
सगळ्यात छोटी बहिण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजू आत्यावर विशेष लोभ होता. संजू आत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करताना म्हटलं आहे.
फक्त पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा…याला औरंगजेबाकडे..; नितेश राणेंचा ओवेसीला सज्जड दम
दरम्यान, एक दिवसाआधीच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं दुबईत ह्यदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यांच्यावर आज मुंबईत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं. ती बातमी संपता ना संपताच संजीवनी करंदीकर यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या दुख:चं वातावरण निर्माण झालं आहे.
Read also:
- रामदास कदमांची लवकरच नव्या जोशात शिवसेनेत दुसरी इनिंग सुरु होणार?
- मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या
- “तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा”, ठाकरे सरकारला राम कदम यांचं खुलं आव्हान!
- राष्ट्रवादी -भाजप युतीच्या चर्चेला जोर; प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी
- “हिरवा अन् भगव्याच्या वादामध्ये मला रंग नसलेला भोंगा हवाय”; अमोल कोल्हेंच्या ‘या’ दमदार भाषणाची चर्चा