जालना : महाविकास आघाडीत सारं काही आलबेल असल्याच्या कल्पनांना सुरुंग लावणारी १० मिनिटांची शिवसेना खासदाराची एक व्हिडीओ क्लिप बाहेर आली आणि सत्तेचा फायदा घेण्यासाठी एकत्र आलेल्या या महाविकास आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी-शिवसेना पक्षांमध्ये किती दरी आहे, हे अखेर अधोरेखित झाले. त्यामुळे, महाविकास आघाडीतील नेत्यांतही एकमेकांविषयी औपचारिता राहिली नसल्याचे दिसून येत आहे.
जालन्यातील एका मेळाव्यात खासदार संजय जाधव यांनी, अधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीच्या प्रकरणावरून भाष्य करताना, “होय! मी त्यांच्या बदलीची शिफारस केली होती, पण मुख्यमंत्र्यांनी ती नाकारल्यानंतर मी त्यांच्या आदेशाचे पालन केले. पण त्यासाठी राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं. आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे. लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू. माकडीण सुद्धा जेव्हा स्वतः बुडायची वेळ येते, तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते”, असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
तसेच त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरही जहरी टीका करत, “एका प्रकरणात आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली. कमिशनरपर्यंत तक्रारी केल्या. कमिशनरने आदेश दिले, दुकानदाराला दुकान बहाल करा आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. पण एवढं असतानाही भुजबळ साहेबांनी एक पत्र दिलं अन् याचं तात्पुरतं दुकान दुसऱ्याला जोडा, असं सांगितलं, जसं काय यांच्या बापाची जहागिरीच आहे”, असा एकेरी शब्दांत त्यांनी भुजबळांवर हल्ला चढवला.
“लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू”, शिवसेना नेत्याचे खळबळजनक विधान
दरम्यान जालन्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर, ३१ जुलैला आंचल गोयल पदभार स्वीकारणार होत्या. त्या २ दिवस आधीच जालन्यात आल्या असताना, अचानक त्यांची बदली रद्द करण्यात आली. या बदलीमागे राजकीय हात असल्याने, याची माध्यमांनी दखल घेतली. मग समाजमाध्यमावरही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. यांनतर २४ तासांच्या आत अंचल गोयल याच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे पालकमंत्र्यांना जाहीर करावे लागले.
Read Also :
- अजित पवारांचे दोन स्वीय सहाय्यक, खास पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी भवनात बसणार
- सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारच्या उदासीनतेचा फटका – आशिष शेलार
- अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील तब्ब्ल ४ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच
- मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण, सगळं केंद्राने करावं, द्याव; मी घरात बसणार किंवा मर्सिडीज चालवणार
- मुंबईची लोकल रेल्वे भाजपाची नोकर आहे का? संजय राऊतांचा रावसाहेब दानवेंना प्रश्न