मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने काल दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवलं. मात्र, दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असं वाटत असतानाच, भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने, सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला.
दरम्यान, यावर आता भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जुंपली असून, संजय राऊत यांनी आज यावरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर, भाजपचे नेते-आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील शिवसेनेला तोडीस तोड उत्तर देत, एकामागोमाग अनेक ट्विटस करत जोरदार निशाणा साधला आहे.
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन त्यांनी #जनाबसेने चा बाबरवादी चेहरा देशासमोर उघडा केला.@BJYM
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
त्यांनी पहिल्यांदा भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले असून, “जनाबसेनेचा बाबरवादी चेहरा देशासमोर उघडा केल्याबद्दल तुमचे अभिनंदन,” असे म्हटले आहे. तसेच, “शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा. महाराष्ट्रातील नव बाबरवाद्यांचा रामभक्तांपुढे कधीही टिकाव लागणार नाही. जनता इटालियन लोटांगण घालू, सुपारीबाज रामद्रोह्यांचे ‘राम नाम सत्य हैं’ केल्याशिवाय राहणार नाही.” अशी जोरदार टोलेबाजी केली आहे.
शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
महाराष्ट्रातील नव बाबरवाद्यांचा रामभक्तांपुढे कधीही टिकाव लागणार नाही…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
तसेच, “राम मंदिर उभारणीला बदनाम कोण करतंय? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, डावे… हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक पक्ष आहेत. त्यांना राममंदिर नकोच होते. आता हे एकवटलेत मंदिर उभारणीत विघ्न आणायला. त्यात भर पडली आहे, ज्वलंत टिपूवादी शिवसेनेची. यांना लक्षात ठेवा.” असा इशारा त्यांनी दिला आहे.
जनता इटालियन लोटांगण घालू, सुपारीबाज रामद्रोह्यांचे 'राम नाम सत्य हैं' केल्याशिवाय राहणार नाही…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
राम मंदिर उभारणीला बदनाम कोण करतंय? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, डावे…
हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक पक्ष आहेत. त्यांना राममंदिर नकोच होते. आता हे एकवटलेत मंदिर उभारणीत विघ्न आणायला. त्यात भर पडली आहे, ज्वलंत टिपूवादी शिवसेनेची. यांना लक्षात ठेवा…— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
“वसूलीसेनेने इटालियन काँग्रेसकडून राम मंदिर आंदोलन बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला खूष करण्यासाठी मंदिर उभारणीला बदनाम करण्याचे आणखीन प्रयत्न होतील. अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून जनतेने सावध रहावे.” अशी टीका करत त्यांनी शिवसेनेवर हल्लबोल केला आहे.
वसूलीसेनेने इटालियन काँग्रेसकडून राम मंदिर आंदोलन बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे.
बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला खूष करण्यासाठी मंदिर उभारणीला बदनाम करण्याचे आणखीन प्रयत्न होतील. अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून जनतेने सावध रहावे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
Read Also :
- ‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’ संजय राऊत यांनी दिला भाजपला थेट इशारा
- “लपत छपत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा.”
- लपून-छपून हल्ला करून शिवसेनेने आपली ‘औरंगजेबी’ वृत्ती दाखवली
- उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय
- मराठा आरक्षण : संभाजीराजेंची कोपर्डीकडे पुन्हा नव्याने वाटचाल