मुंबई : एकनाथ शिंदे यांना वारंवार अपमानाची वागणूक दिल्याने त्यांचा स्वाभिमान जागृत झाल्याने त्यातून त्यांनी बंडखोरी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले नाहीत. त्यामुळेच गुदमरलेल्या शिवसैनिक, मंत्री, आमदार यांना त्यागाच्या भूमिकेतून बंड केला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
भाजपकडून संख्याबळ तपासण्याचे आदेश; महाविकास आघाडी सरकार कोसळणार?
संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने. असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
आघाडीचा खेळ खल्लास; आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून पर्यावरणमंत्री पद हटवलं
एकनाथ शिंदे यांनी योग्यवेळी निर्णय घेतला नाहीतर आनंद दिघे यांच्याबाबत घड़लं ते देखील तुमच्यासोबत घडलं असतं. त्यामुळे प्रसंग घडण्याअगोदर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. सरकार आता अस्तित्वात राहिलं नसून महाराष्ट्रासाठी हे चांगल्यासाठी झालं आहे. अडीच वर्षात कोणताही विकास झाला नसल्याचंही ते म्हणाले. संजय राऊत काहीही बोलतील, त्यांचा आता आवाज खाली बसला आहे. उद्या बंद होणार शिवसेनेमध्ये संजय राऊतांना कोणी घाबरत नाही. शिवसेनेकडे कोणीही आमदार नसल्याचा दावा देखील नारायण राणे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे भेट घेण्याअगोदर राज्यपालांना कोरोनाची लागण; राजभवन कोरोनंटाईन
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येऊ शकतात. त्यामुळे वेळ आली तर भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतो. त्यामुळे भाजपच्या काही आमदारांना भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत पाठवण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्याशी कोणीही संपर्क साधू नये म्हणून भाजपकडून काळजी घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
Read also:
- बंडखोर आमदारांना शिवसेनेचा शेवटचा इशारा, सायंकाळी 5 पर्यंत मुंबईत या अन्यथा..;
- उत्तर महाराष्ट्राची बुलंद तोफ शिंदे गटात सामील; ४७ आमदार सोबत असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा
- जबरदस्तीने माझ्या अंगावर इंजेक्शन टोचले; एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा आरोप
- शरद पवारांचं स्वप्न पुर्ण.. शिवसेना संपली; मनसेचं सुचक वक्तव्य
- उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ? संजय राऊतांचं सुचक वक्तव्य