मुंबई : देशात सध्या राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणावरून राज्यातदेखील राजकारण चांगलेच तापले आहे. या जमीन खरेदीबाबत संजय राऊत यांनी, सामानातून केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपवरून भाजप संतापली असून, भाजप-शिवसेनेमध्ये यावरून काल शिवसेना भवनासमोर खडाजंगी झाली. त्यानंतर आता या दोन्ही पक्षात राजकीय वाकयुद्धाला सुरवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा, “लपत छपत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा.”
सकाळी संजय राऊत यांनी भाजपवर शब्दांची तोफ डागल्यावर, आता महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केश व उपाध्ये यांनी, शिवसेनेवर ट्विट करत सडकून टीका केली आहे. “महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? कॅाग्रेसराष्ट्रवादीवर टीका करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे आता त्यांच्या वळचणीला बसत राम मंदीराचा त्रास होणारी आजची शिवसेना कुठे? सत्तेपाई सत्व गमावले,” असा हल्लबोल त्यांनी केला आहे.
महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि
आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे?
कॅाग्रेसराष्ट्रवादीवर टीका करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे
आता त्यांच्या वळचणीला बसत राम मंदीराचा त्रास होणारी आजची शिवसेना कुठे?
सत्तेपाई सत्व गमावले— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 16, 2021
दरम्यान, भाजपकडून शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर, कलम 143, 147, 149, 392, 324, 323, 354, 509 यांसह विविध कलमांतर्गत, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजप युवा मोर्चाच्या तजिंदर सिंह तिवाना (आयोजक), अजित सिंह आणि इतर एकूण 30 लोकांवर, कलम 188, 269 IPC, 51 तसेच राष्ट्रीय आपात्कालीन कायद्याच्या उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास शिवाजी पार्क पोलिसांकडून केला जात आहे.
Read Also :
- राम मंदिर घोटाळा: ज्यांना आक्षेप असेल त्यांनी पावती दाखवून देणगी परत घेऊन जावी
- भाजप-शिवसेना वाद : किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट, व्हिडीओत बाळासाहेब म्हणत आहेत…
- “शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा…”
- लपून-छपून हल्ला करून शिवसेनेने आपली ‘औरंगजेबी’ वृत्ती दाखवली
- उद्धव मोदींसमोर नाक घासून आलाय, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय