मुंबई : काल राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. संजय राऊतांनी सामनात लिहिलेल्या राम मंदिराच्या लेखाचा निषेध म्हणून, भाजप युवा मोर्चानं शिवसेना भवनावर हा मोर्चा काढला होता. यांनतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा जोरदार राडा झाला.
हे पण वाचा, “शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा…”
यावेळी, शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतच, भाजपच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनाही मारहाण केल्याचा आरोप, भाजपकडून करण्यात येत असून, आता यावरून राजकारण पेटू लागले आहे. यात आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, त्यांची प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच, “अंगावर याल तर शिंगावर घेऊच,” असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.
हे पण वाचा, ‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’ संजय राऊत यांनी दिला भाजपला थेट इशारा
त्यांनी ट्विट केलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या व्हिडीओमध्ये, ‘कारण नसताना कानफाडात माराल तर तुम्ही म्हणाल की, वा छान मस्त बसली. अजून जोरात मारायला हवी होती. इतका बुळचटपणा बरा नाही. त्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे, तो शिवसैनिक. नुसत्या टाळ्या मारण्यासाठी हात नको, कानफाडात मारण्यासाठी ते तयार ठेवा’, अशा तीव्र शब्दांत शिवसैनिकांना आक्रमक राहण्याची सूचना देताना बाळासाहेब दिसत आहेत.
हे पण वाचा, “लपत छपत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा.”
तसेच, ‘शिवसेना भवनासमोर भाजपच्या कोणत्या तरी एका पोरानं, उगाच आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी तो हाणून पाडला आहे. कारण नसताना, शिवसेना भवनावर चाल करून येणं, मोर्चा काढणं, हे कितपत योग्य आहे, तुम्हीच याचं उत्तर द्या. तुम्ही काहीही कराल आणि आम्ही शिवसैनिक गप्प बसणार काय?, असा रोखठोक सवालही यावेळी त्यांनी केला आहे.
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) June 16, 2021
Read Also :
- महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार?
- “.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”; खासदार उदयनराजेंचा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा
- अनिल देशमुखांना धक्का! महत्त्वाची कागदपत्रे हाती, ईडीने नागपूरमध्ये केली 3 जणांची गुप्त चौकशी
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार
- ‘आजच्या चर्चेतून हवा तो तोडगा निघाला नाही, तर काय होईल हे सांगायची गरज नाही’