मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी काल मुक आंदोलन पार पडल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक यांची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे. या भेटीत, संभाजीराजेंनी सरकारसमोर ठेवलेल्या ५ मागण्या आणि मराठा आरक्षणासंबंधीच्या विविध इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
हा पण वाचा, “.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”; खासदार उदयनराजेंचा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा
दरम्यान, ‘आज होणारी ही भेट सकारात्मक न झाल्यास आणि यातून हवा तो तोडगा न निघाल्यास, राज्यात काय होईल हे सांगायची मला गरज नाही,’ असा सूचक इशारा संभाजीराजे छत्रपतींनी बैठकीला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना, आघाडी सरकारला दिला आहे. त्यामुळे, या वक्तव्यानंतर आज होणाऱ्या बैठकीला अतिशय महत्व आले आहे.
हे पण वाचा, राजकीय नेत्यांच्या मुखी ‘मराठा’ असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र ‘खराटाच
तसेच, ‘मुख्यमंत्र्यांसोबत होणारी आजची बैठक, आजच्या ऐवजी उद्या व्हावी, अशी काही समन्वयकांची भूमिका होती. मात्र, ही बैठक आजच व्हावी असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता. त्यामुळे, आज संध्याकाळी ही बैठक होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीआधी, मराठा समन्वयकांशी कोणतीही बैठक झालेली नाही. या मुद्द्यावर आज चर्चा होत असली, तरी मराठा आरक्षणाचा हा लढा कायम सरूच राहणार आहे, ” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
हे पण वाचा, मराठा आरक्षण : संभाजीराजेंची कोपर्डीकडे पुन्हा नव्याने वाटचाल
यावेळी, ‘सरकारने चर्चेचं आमंत्रण दिलं असलं, तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडमध्ये हे आंदोलन होणारच असून, सरकारसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय झाल्यास, नाशिकचे आंदोलन विजयोत्सव म्हणून साजरा करू,’ असं विधान काल संभाजीराजेंनी कालच केलं आहे.
Read Also :
- भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याची काँग्रेसमध्ये घरवापसी?
- “शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा…”
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार
- अनिल देशमुखांना धक्का! महत्त्वाची कागदपत्रे हाती, ईडीने नागपूरमध्ये केली 3 जणांची गुप्त चौकशी
- ‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’ संजय राऊत यांनी दिला भाजपला थेट इशारा