मुंबई : बारामतीत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात दंड थोपटल्याने महायुतीत शिंदेंची मोठी गोची झाली आहे. मुख्यमंत्र्यांकडून विजय शिवतारे यांना समजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र बारामतीत अपक्ष म्हणून निवडणुक लढणार म्हणजे लढणार, या भूमिकेवर शिवतारे ठाम राहिले आहेत. यातच आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतरही विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले असल्याची त्यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंच्या विरोधात भाजप बंडाच्या पावित्र्यात..”, मावळात महायुतीत मिठाचा खडा ?
पवारांना विशेषता अजित पवारांना कोणालाही विरोध करण्याची हिमंत नाही. सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता निर्माण झाली आहे. ती तोडण्यासाठी मला उभ राहणं ही जनतेची इच्छा असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. बारामती मतदारसंघातील गणित, तसेच निकालही सकारात्म येईल असेही त्यांना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आपल्याला युतीचा धर्म पाळावा लागेल. त्यावर मी आपल्या शब्दाबाहेर नाही, परंतु जनतेचा शब्द देखील तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना विचारून ठरवणार आहे. पवारांना पराभुत करण्याची ऐतिहासिक संधी मला सोडायची नाही. असेही विजय शिवतारे म्हणाले.
हेही वाचा…“आजोबाला अर्धांगवायू, वय वर्षे ६२, पेशाने रिक्षाचालक, येणार तर मोदीच “, भाजप नेत्याचा अनुभव
फक्त निवडणुकीकरीता पुरंदर तालुक्याला २५ हजार कोटी रूपये दिले, मात्र इतर तालुक्यांना अजित पवारांनी काहीच दिले नाही. महाविकास आघाडीत असतांनाही अजित पवारांनी अशा पद्धतीने काम केले आहे. यातच पैसे वाटून पक्ष वाढवण्याचा प्रकार अजित पवारांनी केला आहे. असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. अजित पवारांनी माझा आवाका काढला होता. त्यामुळे आता अजित पवार इकडे तिकडे तडफोय का ? असा सवालही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…माढ्यात महायुतीचे नेते आपल्याच उमेदवाराचा गेम करणार, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून महाजनाला पाचरण
हेही वाचा…“याच्यासारखा नालायक माणूस नाही”, सख्या भावाने अजित पवारांना खडसावलं
लोकसभेसाठी शरद पवारांचे ‘१०’ शिलेदार ठरले ; भाजपसह अजित पवारांनाही देणार मोठी टक्कर
हेही वाचा…कोल्हापुरची जागा शाहू महाराजांसाठी तर सांगलीतून चंद्रहार पाटील, मविआचं जागावाटपाचं ठरलं
हेही वाचा…शिरूर लोकसभाबाबत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना, आढळरावांची मुख्यमंत्र्यांकडून चर्चेवर बोळवण