पुणे : शहरातील नवले ब्रिज जाळपोळ प्रकरणी आता पुण्यात गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. काल मराठा आरक्षणासाठी नवले ब्रिजवर आंदोलकांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलं होतं. त्याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. काल सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होतं.
हेही वाचा…प्रवेश बंदी असताना आलेल्या आमदार विश्वजीत कदम यांना पाठवलं माघारी
नवले ब्रिज आंदोलन प्रकरणी आतापर्यंत सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये १० जणांसह ४०० अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी मंगळवारी दुपारी नवले ब्रिजवर आंदोलन करण्यात आलं होतं. याच प्रकरणी आता पुण्यातील सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण घालवलं,” भाजपचा जोरदार पलटवार
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार २९४ जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे. १ जानेवारी २०२२ ते ३१ ऑक्टोंबर २०२३ या काळात सुमारे १२ हजार ९११ अर्ज आले होते. महसुली पुरावे तपासून त्यातील १२ हजार २९४ जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. एकूण अर्जांच्या तुलनेत ९६ टक्के प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे. उर्वरित ४६० अर्ज प्रलंबित असून अर्जदारांनी वंशावळ पुरावे सादर केल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार असल्याचं जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू
हेही वाचा…बीडच्या घटनेत ३४ आरोपींना अटक..! “तर बीडला येईल आणि मराठे काय असतात ते कळेल”, मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…“शिंदे समितीचा अहवाल प्राथमिक असून अजून काम करणं बाकी”, मराठा आरक्षणाला अजून वेळ लागणार ?
हेही वाचा…“घर जळत होतं, तेव्हा मुल देवा घरात हात जोडून होती,” क्षीरसागर कुटुंबीयांनी सांगितला धक्कादायक अनुभव
हेही वाचा…“जाळपोळ झाली तेव्हा घरात होतो, काही लोकांनी ठरवून जाळपोळ केली”, योगेश क्षीरसागरांनी दिली प्रतिक्रिया