मुंबई : काही महिन्यांपूर्वी अंबानींच्या ‘अँटिलीया’ इमारतीबाहेर जिलेटीनच्या स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली आणि त्यानंतर घडलेल्या घटनांनी राज्याचे राजकारण अक्षरशः पूर्णपणे ढवळून गेले. त्यानंतर या सगळ्या प्रकरण जे संशयित म्हणून होते, त्यांची NIA, CBI, ED सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरु झाली. दरम्यान, या सगळ्या प्रकरणातला एक महत्त्वाचा टप्पा आज नोंदवला जात असून, NIA ने न्यायालयात या घटनेतील आरोपींविरोधात १० हजार पानांचे आरोपपत्र दाखल केल आहे.
“पक्षात महिलांना डावललं जातं”, या मंदा म्हात्रेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…
शुक्रवारी एनआयएने हे आरोपपत्र दाखल केले असून, त्यात अनेक धक्कादाय खुलासे करण्यात आले आहेत. त्यातील एक खुलासा म्हणजे, सचिन वाझेने स्फोटकांची गाडी अंबानींच्या इमारतीबाहेर का ठेवली? या प्रश्नाला घेऊन अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र, आता त्याचेही कारण मिळाले असून, प्रसिद्धिसाठीच त्याने स्फोटक प्रकरणाचा कट रचला, असे NIA च्या आरोपपत्रात म्हटले गेले आहे. याद्वारे उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा नावलौकिक प्राप्त होईल, अशी आशा वाझेला होती.
“आम्ही खंजीर खुपसत नाही, थेट समोरून कोथळा काढतो” राऊतांचा घणाघाती हल्ला
तसेच, या आरोपपत्रात जिलेटिन स्टिक्स स्फोटक, गाडीत ठेवलेली धमकीचे पत्र, विक्रोळीत गाडी चोरीचा गुन्हा आणि मनसुख हिरेन हत्येच्या गुन्ह्यांचा आरोपपत्रात समावेश आहे. एकूण १० आरोपींविरोधात आरोप केले गेले असून, त्यात सचिन वाझे, नरेश गोर, विनायक शिंदे, रियाझुद्दीन काझी, सुनील माने, संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोठकुरी, विकी बाबा, मनीष सोनी, आणि प्रदीप शर्मा यांचा समावेश आहे.
महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक, पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट
दुसरीकडे, या सगळ्या प्रकरणाशी संबंधित एकूण २०० जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून, कट रचणे, अपहरण करणे, स्फोटकाबाबत निष्काळजी पणे वागणे, स्फोटक विना परवाना बाळगणे याचबरोबर यूएपीए अँक्टही लावण्यात आला आहे. गाडीत धमकीचे पत्र ठेवण्यात आले होते. ही धमकी दहशतवादी संघटनेकडून देण्यात आल्याचे दाखवण्यासाठी ‘जैश ऊल हिंद’ संघटनेचे नाव वापरण्यात आल्याचे सुद्धा यातून स्पष्ट झाले आहे.
Read Also :
- पंकजा मुंडे यांना मोठा झटका, वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला अटक
- परप्रांतीयांना ओबीसीत आरक्षण दयायला भाजपचा विरोध?, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
- खडसेंना दणका; ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश
- अनिल देशमुख प्रकरणात नवी माहिती समोर, आयफोनसाठी केला चौकशी अहवाल लीक
- “भाजपत देखील महिलांना डावललं जातं!”, आमदार मंदा म्हात्रेंचं मोठं विधान