मुंबई : १०० कोटी वसुली प्रकरण आणि अँटिलीया स्फोटकं प्रकरणात, मुख्य आरोपी असलेला निलंबित API सचिन वाझे, सध्या तळोजा जेलमध्ये आहे. इथे, ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेच्या चौकशीसाठी कोर्टाची परवानगी घेऊन, त्याची चौकशी केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे वाझेने ईडीकडे अनेक मोठे खुलासे केले असून, या माहितीमुळे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखीन दलदलीत फसण्याची चिन्हं आहेत.
नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांचे सत्य बाहेर आलं पाहिजे, अन्यथा हा पोरखेळ बंद करा – मुनगंटीवार
ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेला तळोजा जेलमध्ये, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या तक्रार अर्जाबाबत, परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीचा आरोपाबाबत आणि काही बार मालकांनी सचिन वाझेला दिलेल्या पैशांबाबत, तसेच अनिल देशमुख यांचे पी. ए. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना दिलेल्या पैश्यांबाबत प्रश्न विचारले असून, त्यांची उत्तरे देताना सचिन वाझेने, अनेक मोठे खुलासे अधिकाऱ्यांसमोर केले आहेत.
“हो! पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय हे खरं आहे”
देशमुख यांनी वाझेला बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप सिंग यांनी केला होता. या आरोपानुसार ईडीने तपास केला असता, अनेक बार मालकांच्या घेतलेल्या जबाबात, बार मालकांकडून डिसें. २०२०-फेब्रु. २०२१ काळात एकूण ४ कोटी ७० लाख रुपये गोळा करण्यात आले आहेत. हे पैसे वाझेला देण्यात आले आहेत, असा खुलासा झाला होता.
गृहमंत्री अमित शहांचा दौरा: दहा ते दुपारी एक दरम्यान दारे खिडक्या बंद करण्याचे पोलिसांचे आदेश
मात्र, बार मालकांकडून पैसे घेताना, ‘नंबर एक’ना हे पैसे द्यायचे आहेत, असं वाझे सांगायचा. या ‘नंबर वन’चा खुलासा ईडीच्या अधिकाऱ्यांना होत नव्हता. यावेळी घेतलेल्या ईडीच्या जबाबात याचाही खुलासा झाला असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे. हे नंबर वन म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच असल्याचं वाझेनं सांगितलं आहे. तसेच, वाझेने ईडीला सहकार्य केल्याचं देखील सूत्रांनी म्हणलं आहे. आता ४ कोटी ७० लाख रुपयांपैकी बाकी रक्कम कुठून गोळा झाली, कोणी गोळा केली, ती रक्कम कोणाला देण्यात आली, याचा तपास ईडीचे अधिकारी करत आहेत.
नाशिकच्या हाय सिक्युरिटी असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून ५ लाखांच्या नोटा चोरीला
सध्या तळोजा कारागृहात, वाझे आणि अटकेत असलेले संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांची सोमवारी समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. गेल्या ३ दिवसांत एकूण १५ तास चौकशी या सगळ्यांची करण्यात आली असून, आता चौकशीचे सत्र थांबवण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
Read Also :
- “त्यांचेच कौरव-पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ”, काँग्रेसचा भाजपला टोला
- …म्हणून तुम्ही दिलेले राजीनामे, मी नामंजूर करते, पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद
- “मोठा नेता नेहमीच त्याग करत असतो, मंत्रिपदाची मागणी, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत.”
- मला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी संपले नाही; पंकजा मुंडे कडाडल्या
- …तेव्हा पंकजा मुंडेंनी अनेकांवर अन्याय केला… आता त्यांच्यावर – विनायक मेटे