मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील चार नेत्यांना स्थान मिळाले, मात्र चर्चेत असलेल्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही. यावरून मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, भाजपकडून मुंडे भगिनींना सातत्याने डावललं जात आहे, असा आरोप करत त्यांनी राजीनामाअस्त्र वापरले आहे. प्रीतम मुंडेंना न्याय मिळावा, या मागणीसाठी आत्तापर्यंत १०५ विविध स्तरावरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून, यामुळे भाजपत सध्या गोंधळ उडाला आहे.
मला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी संपले नाही; पंकजा मुंडे कडाडल्या
या पार्श्वभूमीवर, पंकजा मुंडे यांनी थेट दिल्लीवारी करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली असून, यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते विनोद तावडे व विजया रहाटकरही होते. त्यानंतर आज त्यांनी नाराज कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये भेट घेऊन, त्यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्या.
…तेव्हा पंकजा मुंडेंनी अनेकांवर अन्याय केला… आता त्यांच्यावर – विनायक मेटे
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना, “मंत्रिपदाची मागणी, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत. मी कधीही मंत्रीपद मागितलं नाही, उलट ते मिळत असतानाही मी ते घेतलं नाही. मला कधीही वाटलं नाही, मला मंत्री-संत्री करा. त्यामुळे, माझ्या समाजाच्या मंत्र्याला, प्रितम ताई मंत्री झाल्या नाहीत, म्हणून मी अपमानित करणार नाही. आज मी ४५ वर्षांची, तर कराड साहेब ६५ वर्षांचे आहेत. मी त्यांचा अपमान करणार नाही,” असं म्हणत त्यांनी मंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
तसेच, “प्रीतम मुंडेंना मंत्रिपद मिळावं, या समर्थानार्थ ज्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्या सर्वांचे राजीनामे मी नामंजूर करते,” असं म्हणत त्यांनी, “राजकारणात मी लोकांची कामं करण्यासाठी आले आहे. त्यामुळे मी किंवा प्रीतम मुंडे यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवलेली नाही,” असं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, “दिल्लीत मला पक्षश्रेष्ठींकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली असून, माझ्यावर कधीही, कुठलाही दबावतंत्राचा वापर केला गेला नाही. मोठा नेता नेहमीच त्याग करत असतो,” असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचं सांत्वन केलं आहे.
Read Also :
- धक्कादायक! खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गायब?
- शिवसेनेला धक्का: दोन बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
- पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; भाजप नेते राम शिंदे म्हणतात….
- महाविकास आघाडीच्या नाटकीपणापासून आत्ताच सावध व्हा; खासदार सुजय विखेंचे जनतेला आवाहन
- नाना पटोले महत्त्वाची व्यक्ती, काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी; राऊतांची सावध भुमिका