नांदेड : भाजपाने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले. याची जाणीव आमदार पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना आहे. त्यामुळे पंकजा मुंडे कोणताही चुकीचा निर्णय घेतील, असे आपल्याला वाटत नाही, असे मत शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे आज व्यक्त केले. तसेच खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामे द्यावे, तरच ते स्वीकारले तरी जातील, अशी प्रतिक्रिया देत आमदार मेटे यांनी मुंडे यांच्याकडून राजीनामासत्र नाट्य सुरू असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.
नारायण राणे इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ कमिटीवर, कुणाला कोणती मिळाली कमिटी; वाचा सविस्तर
देगलूर- बिलोली विधानसभा मतदार संघात शिवसंग्रामच्या माध्यमातून सुरेखा पुणेकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. यानिमित्ताने मेटे यांनी नांदेड दौरा केला असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यांच्या समवेत शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, सचिन पाटील हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेटे म्हणाले, पंकजा मुंडे जेव्हा सत्तेत होत्या तेव्हा त्यांनी अनेकांवर अन्याय केला. आता त्यांच्यावर अन्याय होतेयं तर काय झालं?, तेव्हाचा झालेला अन्याय देखिल बघणे गरजेचे आहेत, असे मेटे यांनी सांगितले.
शिवसेनेला मोठा धक्का, माजी राज्यमंत्री पटोलेंच्या उपस्थितीत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
आमदार मेटे यांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली. ते म्हणाले, तत्कालिन मुख्यमंत्री फडणविस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे सरकारला टिकवता आले नाही. त्यांनी न्यायालयात चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोपही मेटे यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्य सरकारला मार्गदर्शन केले नाही. हे मराठा समाजाचे दुर्देव असल्याची टीका आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची इच्छा आहे की नाही मला माहित नाही. पण सरकार ज्या पद्धतीने मराठा आरक्षणावर भूमिका घेत आहे. त्यावरून मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही, असे स्पष्ट दिसत असल्याची टीका त्यांनी केली.
Read Also :
- धक्कादायक! खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गायब?
- नाना पटोले महत्त्वाची व्यक्ती, काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी; राऊतांची सावध भुमिका
- नारायण राणे इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ कमिटीवर, कुणाला कोणती मिळाली कमिटी; वाचा सविस्तर
- शिवसेनेला मोठा धक्का, माजी राज्यमंत्री पटोलेंच्या उपस्थितीत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
- विधान परिषद १२ आमदार नियुक्तीचा पेच कायम : राज्यपालांनी ८ महिने उलटूनही निर्णय घेतला नाही