मुंबई : नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते माजी विधानसभा अध्यक्ष देखिल आहेत त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी आहे. अशा वेळी पवारांच्या नजरेत ते छोटे नेते असले तरी त्यांच्यावरील जबाबदारी पाहता ते फार मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले आरोपांची चौकशी होणे गरजेचे आहे. सत्य काय आहे ते बाहेर यायला पाहिजे. अन्यथा हा पोरखेळ थांबवावा, अशी प्रतिक्रीया भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; भाजप नेते राम शिंदे म्हणतात….
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवली आहे”, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या नव्या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे भाजपचे नेते सुधिर मुनगंटीवार यांनी आता सर्वपक्षीय चौकशीची मागणी केली आहे.
.शिवसेनेला मोठा धक्का, माजी राज्यमंत्री पटोलेंच्या उपस्थितीत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
नाना पटोलेंनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी जेव्हापासून स्वबळाची घोषणा केली. तेव्हापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पायाखालची जमिन सरकली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
विधान परिषद १२ आमदार नियुक्तीचा पेच कायम : राज्यपालांनी ८ महिने उलटूनही निर्णय घेतला नाही
नाना पटोले हे विधान परिषदेचे सदस्य देखिल आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमायला हवी. कारण कोणतीही समिती नेमल्यास ती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चालते. परंतू, या आरोपांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नाही तर सर्वपक्षीय सदस्यांच्या नेतृत्वाखाली तपास यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्य बाहेर येईल. यावर तात्काळ अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अन्यथा हा पोरखेळ त्यांनी थांबवावा, असे मत मुनगंटीवार यांनी मांडले आहे.
Read Also :
- गृहमंत्री अमित शहांचा दौरा: दहा ते दुपारी एक दरम्यान दारे खिडक्या बंद करण्याचे पोलिसांचे आदेश
- साखर उद्योगातील समस्यांवर सकारात्मक तोडगा काढा; जयप्रकाश दांडेगावकरांच्या पवारांना सुचना
- “त्यांचेच कौरव-पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ”, काँग्रेसचा भाजपला टोला
- …म्हणून तुम्ही दिलेले राजीनामे, मी नामंजूर करते, पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद
- “मोठा नेता नेहमीच त्याग करत असतो, मंत्रिपदाची मागणी, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत.”