नाशिक : आज सकाळी मंत्रालयातून, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना क्लीन चिट देणारा झोटिंग समितीचा अहवाल, मंत्रालयातून गहाळ झाल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आणि या प्रकारामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली. दरम्यान, असाच एक प्रकार नाशिकमध्ये घडला असून, नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून तब्ब्ल ५ लाखांच्या नोटा चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
शिवसेनेला धक्का: दोन बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
नाशिक नोट प्रेस, ही अत्यंत हाय सिक्युरिटी असलेल्या सरकारच्या संस्थांपैकी पैकी एक म्हणून ओळखली जाते. तसेच, ती देशभरातील नोटा छपाईच मुख्य केंद्र आहे. अशा करन्सी नोट प्रेसमधून इतकी मोठी रक्कम, अशाप्रकारे अचानक नेमकी कशी आणि कुठे गेली, याची चौकशी पोलिसांकडून सुरू असून, या तपासासोबतच, करन्सी नोट प्रेसच्या व्यवस्थापनाने, याप्रकरणाची अंतर्गत चौकशी देखील सुरू केली असून, तो अहवाल पोलिसांना सुपूर्द केला आहे.
धक्कादायक! खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गायब?
त्यामुळे, या अहवालाच्या आधारावर आता, हाय सिक्युरिटी असलेल्या या नोट प्रेस मध्ये तब्बल ५ लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्याने, ही चोरी आहे की गैरव्यवहार याबाबतची पुढची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, हे प्रकरण बाहेर आल्याने याबाबत थेट बोलण्यास कुणीही तयार नाही. हे प्रकरण दडपून ठेवण्याचा प्रयत्न फोल ठरल्याने, अखेर नाशिक नोट प्रेसच्या व्यवस्थापनाला याबाबत पोलीस स्टेशन गाठावे लागले. मात्र, गेल्या नेक दिवसांपासून हा गैरव्यवहार किंवा चोरी लपवून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे.
…तेव्हा पंकजा मुंडेंनी अनेकांवर अन्याय केला… आता त्यांच्यावर – विनायक मेटे
दरम्यान, याप्रकरणी आता नाशिकच्या उपनगर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, ५०० रुपयांचे एकूण १० बंडल, म्हणजे ५ लाख रुपये गहाळ झाले असल्याचं, पोलिसांनी सांगितलं आहे. शिवाय १२ फेब्रुवारी पासून हे बंडल गहाळ झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
Read Also :
- साखर उद्योगातील समस्यांवर सकारात्मक तोडगा काढा; जयप्रकाश दांडेगावकरांच्या पवारांना सुचना
- “त्यांचेच कौरव-पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ”, काँग्रेसचा भाजपला टोला
- …म्हणून तुम्ही दिलेले राजीनामे, मी नामंजूर करते, पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद
- “मोठा नेता नेहमीच त्याग करत असतो, मंत्रिपदाची मागणी, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत.”
- मला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी संपले नाही; पंकजा मुंडे कडाडल्या