सांगली : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका कुणाला कळली नाही. ते ज्या भुमिका घेतात त्या त्यांनाच माहिती असतात. संभाजी राजे यांनी गेली सहा वर्ष राष्ट्रपती कोट्यातून खासदार केलं आहे. आम्ही त्यांना कधी पक्षाचा प्रचार करण्यासाठी सांगितलं नाही. राष्ट्रपती कोट्यातून छत्रपती घराण्यांचा आम्ही पुर्ण सन्मान केला. आता जर शरद पवारांना असं वाटत असेल तर ते खासदार झाले पाहिजेत. मग आता सहावी जागा का? त्यांना हक्काची जागा दिली पाहिजे. छत्रपती घराण्यांकरीता आम्ही सहा वर्ष त्यांना जागा दिली, आता त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडायलं हवं. असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत आगामी राजकीय वाटचालीबाबत घोषणा केली. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी मला या जागेसाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही केले होते.
मात्र राज्यसभेच्या सहाव्या जागेवर लढणार असल्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. त्यामुळे संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला आहे. अशातच आपला राज्यसभेचा मार्ग सुकर करण्यासाठी संभाजीराजेंनी शिवसेनेत जाण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे.
“मोदींची धार्मिक विखार अन् हिंसक विचार पेरणारी विचारसरणी”; ब्रिटीश नेत्यानी मांडले आपले मत
दरम्यान, शिवसेनेने राज्यसभेची जागा लढवणार असल्याची आज घोषणा केली. त्यामुळे संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग खडतर झाला आहे. तर दुसरीकडे संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना शिवसेनेच्या दुसऱ्या जागेसाठी उमेदवारी देण्यात येईल, अशी ऑफर आली आहे. त्यामुळे आपल्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.
Read also:
- “पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
- नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण
- जितेंद्र आव्हांडाचं एक ट्विट; अन् चार जणांवर कारवाईचा बडगा
- “एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना”; अयोध्या दौऱ्याबाबत सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
- “फडणवीस साहेब लोकांचा गैरफायदा किती घेणार, देशाचे तुकडे करण्याचा मानस आहे का?”