मुंबई : एकनाथ शिंदे यांच्याकड़ून हरिश साळवे आणि नीरज किशन कौल न्यायालयात आपली बाजू मांडत आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या बाजून अभिषेक मनू सिंघवी आणि सरकारकडून कपिल सिब्बल आणि रविशंकर हे विधानसभा उपाध्यक्षांकडून बाजू मांडत आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या जोरदार युक्तिवाद सुरू असताना आता शिंदे गटाकडून आपली भूमिका मांडली आहे. त्यासंदर्भात शिंदे गटातील आमदार दिपक केसरकर यांनी पत्र लिहिलं आहे. त्याचबरोबर आता एकनाश शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं आव्हान शिवसेना उपनेते सुनील बागुल यांनी पत्र लिहिलं आहे.
“राज्य सरकारचा पाठिंबा कोर्टात नाही तर राज्यपालांकडे जाऊन सांगायचा असतो”; जयत पाटलांचा शिंदेंना टोला
माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब माननीय श्री केसरकर साहेब,
गेल्या 21 तारखेपासून आम्ही तुमच्या दोन्ही नेत्यांच्या तोंडून आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडणार नाही. आम्ही दिघे साहेबांची शिवसैनिक आहोत. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आहोत, आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर सरकार नको तर आपण बीजेपी बरोबर सरकार स्थापन केले पाहिजे तसेच माननीय उद्धवजी साहेब म्हणाले, “मी तयार आहे पण तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला जाऊन हे सांगत आहे.. तुम्ही मला हे मुंबईत सांगू शकला असता. तुमच्या तत्वाच्या आणि स्वाभिमानाच्या भांडणात शिवसैनिक मरतो आहे. एक शिवसैनिक दुसऱ्या शिवसैनिकाचा बोर्ड पाहतोय, काळे फास्तो, विरोधात घोषणा देतो. मोर्चा काढतो, तिरडी काढतो, वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतो आहे.
“राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावुन आलं पाहिजे”; रूपाली पाटील
तसेच शिवसेनेच्या आमदारांची नातेवाईक आमदारांचे समर्थक व पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक है शिवसेनेच्या विरोधात उभे राहून चॅलेंज करत आहे. शिवीगाळ करत आहे. आव्हान करत आहे आणि शक्ती प्रदर्शन करत आहे या सर्वामध्ये शिवसैनिकच मरतो आहे शिवसैनिकाला दोन्ही बाजू सांभाळायच्या असतात. त्याला दोन्ही प्रिय आहे. शिंदे साहेब भी दिघे साहेब आणि तुमचे सुद्धा काम बघितले आहे. तुम्ही अनेक अॅम्बुलन्स वाटप केलेले आहे. तुम्ही अनेकांना नोकरी लावलेली आहे. गरिबांसाठी तुम्ही जीव का प्राण आहे. शिवसेनेबद्दल कोणी चुकीचे बोलले तर त्याच्या कानफटीत लावण्याची ताकद तुमच्यात आहे.
“बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अन् धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय”;
शिवसेना तुमची जीत की प्राण आहे. तुम्ही शिवसैनिकाला अनेक संकटातून बाहेर काढले आहे. आज तुमच्या समोर शिवसेनेचे बॅनर फाडले जात आहे. शिवसेना कार्यालयाची तोडफोड होते याचे दुःख तुम्हाला होऊन सुद्धा दाखवता येत नाही. ज्या शिवसेनेवर तुम्ही अति प्रेम केलं त्याची दुर्दशा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघत आहे तसेच माननीय उद्धवजी ठाकरे याना त्याच्या छातीमध्ये 8 स्टेन आहे. त्यांच्या मानेवी खूप मोठी सर्जरी झालेली आहे. त्यांना करोना झालेला आहे त्यांची तब्येत खूप खराब आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे अनेक आमदार आहेत आणि रोज एक एक आमदार येतो आहे है सर्व बघितल्यानंतर मनाला खूप वेदना होत आहे जी शिवसेना रात्र पहाट कडून वाढवली त्याची अशी दुर्दशा बघतांना मनाला खूप वेदना होतात. तुम्हाला शिवसेना पाहिजे.
उद्धवजना तुम्ही पाहिजे आणि तुम्हाला बीजेपी पाहिजे याचा जर योग्य ताळमेळ झाला तर शिवसेना सुद्धा टिकेल तुम्हाला जनतेच्या कामासाठी बीजेपी हवी आहे तेसुद्धा साध्य करता येईल, परंतु इकडे तिकडे जाऊ नका, नको प्रहार, नको बीजेपी, नको मनसे आपण शिवसेनेतच आपला स्वाभिमान दाखवायचा, साहेब, शिवसेनेतच राहा. उद्धव साहेबांच्या बरोबरच राहा. आम्ही राज्यस्तरावरील शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव साहेबांना विनंती करू, साकडे घालू आणि त्यांना तुमच्याबरोबर राहण्याची विनंती करू. तुम्ही सुद्धा साहेबांना एक मताने सांगा कि साहेब झाले गेले विसरून जा आम्हाला समजून घ्या आणि महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी शिवसैनिक याला वाचवा, ही नम्र विनंती करतो.
Read als
- “महाराष्ट्रातील १४४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपाने आसाममध्ये १२६ जणांकडे दुर्लक्ष केले”
- “बेडकाच्या डबक्यात भाजपने उतरू नये, नाहीतर फडणवीस, मोदींची अप्रतिष्ठा होईल”
- “कारकुनच्या पदावरून उचलून राजसाहेबांनी सामानाचा संपादक बनवला”; मनसेचा राऊतांना टोला
- “मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशिन”; दिपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं
- “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं; बंडखोर आमदार दिपक केसरकर