पुणे : शिवाजी पार्क येथील मैदानावर मनसे तर्फे दिपोत्सवाचं कार्यक्रम आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर आल्याने राजकीय चर्चेंना तोंड फुटलं. त्यावर राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी फडणवीस आणि मनसेवर खोचक टिका केली आहे.
“स्वत; उद्धव ठाकरे मैदानात आले की भाजपचा पालापोचाळा होईल”
अलिकडील काही भेटीगाठीवरून मनसे आणि भाजप आगामी निवडणुकांमध्ये युती करणार असल्याचं चित्र दिसत आहे. यादरम्यानच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यावरून भाजप व मनसे यांचं नातं लग्नाच्या आधी लीव इन रिलेशशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यासारखं झालं आहे. दोघांचीही पार्टनर बदलायची सवय व पुर्वानुभव बघता हे नातं मुंबई महानगर पालिका निवडणुकीपर्यंत टिकेल असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.
“राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं”; शिंदे, फडणवीस अन् ठाकरे भेटीवर भाजपची प्रतिक्रिया
दरम्यान, आगामी महापालिका तसेच विधानसभेच्या सर्व निवडणुका एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. यातच राज ठाकरे यांच्या अलिकडेच भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. यामध्ये भाजपसोबत मनसे देखील एकत्रित निवडणुका लढणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्यावर मनसेकडून अद्यापही दुजोरा देण्यात आला नाही.
Read also
- “तुझ्या वडिलांना देखील धुळ चारली आहे, तुला पण..”; आमदार वैभव नाईक भडकले
- “महाराष्ट्रद्रोही सरकारचा जाहीर निषेध..” जिल्हा परिषदेतील 13,521 पदांची भरती रद्द केल्याने राष्ट्रवादी आक्रमक
- “चिपळूनमध्ये येऊन भास्कर जाधवांना ठोकून काढू”; प्रवीण दरेकरांचा इशारा
- “मोदींना खुश करण्यासाठी शिंदे-फडणवीस महाराष्ट्राला अजून किती लुटू देणार”?
- “कृषीमंत्र्यांनी थातुरमातूर दौरे करून शेतकऱ्यांची टिंगल केली”; राष्ट्रवादीची जहरी टिका