पुणे : मुंबईतील १०० कोटी वसूली प्रकरण जोरदार गाजले असतानाच दुसरीकडे पुण्यामध्ये असाच प्रकार दिसून येत आहे. पुणे महापालिकेच्या उपायुक्त माधव जगताप यांनी प्रशासनाला दिवसाला १० लाख रुपये वसूल करून देण्याचा आदेश दिला आहे. सोशल डिस्टन्स न पाळणारे, मास्क न वापर करणार्यांवर कारवाई करा. रोज १० लाखाचा दंड (१००००००) वसूल असा आदेशच उपायुक्तांनी काढला असल्याने पुण्यातील व्यापारीवर्ग चांगलाच आक्रमक झाला आहे. दिवसाला १० लाख रूपये वसूल करण्याचा आदेश म्हणजे तालिबानी पद्धतीने काम करण्याचा नमूना असल्याची व्यापाऱ्यांनी टीका केली आहे.
“…याचा अर्थ त्या कारवाया सूडभावनेने”, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे, अनेकांच्या तोंडाला मास्क नसल्याचे प्रकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे, महापालिका उपायुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अतर्गत कार्यवाई करून १० लाख रुपये दिवसाला वसूल करा, असे आदेशच काढले आहेत.
#पुणे: सोशल डिस्टन्स न पाळणारे, मास्क न वापर करणार्यांवर कारवाई करा.रोज १० लाखाचा दंड (१००००००) वसूल करा, उपयुक्त माधव जगताप यांचा आदेश. हा आदेश म्हणजे #तालिबानी पद्धतीने काम करण्याचा नमूना असल्याची व्यापार्यांची टीका #म#मराठी@PMCPune@iShitalPawar @PSamratSakal@PuneriSpeaks pic.twitter.com/dToInGtr0z
— Brijmohan Patil (@brizpatil) August 28, 2021
कोरोनाच्या अनुषंगाने मास्क न लावणे, सोशल डिस्टंसींग न पाळणे व कारवाई करून सील केलेल्या आस्थापना इत्यादीबाबत दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच यापुढे कारवाई करण्यात यावी आणि मनपा कार्यक्षेत्रात एकून १० लाख दंड वसूलीचे उदीष्ट प्रति दिनी अपेक्षीत आहे. वसूली बाबतचा दैनंदिन अहवाल रोजचे रोज आपत्ती व्यवस्थापन मनपा या व्हॉट्स अप ग्रुपवर न चुकता पाठविण्यात यावा. वसूलीचे उदिष्ट पुर्ण करणे व अहवाल सादर करणे याबाबत कसूर केल्यास कडक कार्यवाई करण्यात येईल, असेही त्यांनी आदेशामध्ये म्हटले आहे.
Read Also :
- राजनाथ सिंग यांचे महाराजांवरचे ‘ते’ वक्तव्य वादात, कोल्हेंकडून निषेध तर संभाजी ब्रिगेडची माफीची मागणी
- नाव राणे आणि चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांची सणसणीत चपराक
- उन्होंने हवा कर दी सर! नारायण राणेंना केंद्रातील बड्या नेत्याचा फोन, संवाद झाला व्हायरल
- “अजून एखादा ‘करेक्ट’ कार्यक्रम करून टाकू”, संजय राऊतांचा सूचक इशारा
- तहसीलदार देवरे प्रकरणाला राजकीय गालबोट; चित्रा वाघ सुपारी घेवून काम करतात?