जळगाव: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत रकमेसाठी सध्या महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांना नोटिसा दिल्या गेल्या होत्या. त्यामध्ये अनेक नेते मंडळी आणि सत्तेत असलेल्या मंत्र्यांच्या साखर कारखान्यांचा देखील समावेश होता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत रकमेप्रकरणी मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील साखर कारखान्याची जंगम व स्थावर जप्त करून थकीत रकमेची वसुली करावी असा आदेश नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी मालेगावच्या तहसीलदारांना दिले आहेत.
हे पण वाचा, ‘आर या पार’ अगस्ती कारखाना आम्ही वाचवणारच; विरोधकांना मधुकर पिचड यांचे खुले आवाहन
हे पण वाचा, अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे सुमारे सहा महिन्यांपासून उसाचे पैसे मिळण्याची प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मालेगाव तालुक्यातील रावळगाव एस.जे.शुगर या कारखान्याकडे ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पाच-सहा महिन्यांपासून पैसे थकले आहेत. चाळीसगाव व भडगाव या दोन्ही तालुक्यांत मिळून जवळपास ५० हजार मेट्रिक टन ऊस कारखान्याला दिला गेलेला आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, डॉ. सुरेश भोसले आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात कृष्णा साठी ‘खलबतं’; निवडणुकीचा सस्पेन्स वाढला
यासंदर्भात मागच्याच आठवड्यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अलिबाग येथे जाऊन कारखान्याचे मालक आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार जयंत पाटील यांच्यात भेट झाल्यानंतर १५ दिवसांत शेतकऱ्यांचे थकलेले पेमेंट देण्याचे आमदार पाटील यांनी मान्य केले होते. १५ कोटी रुपयांहून अधिक थकबाकी या कारखान्याची होती. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी एस. जे. शुगर कारखान्याला ऊस दिला होता मात्र पेमेंट न झाल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आदेश देत कारखान्यावर कारवाई करण्यास सांगितले आहे.
- महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार?
- “.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”; खासदार उदयनराजेंचा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा
- अनिल देशमुखांना धक्का! महत्त्वाची कागदपत्रे हाती, ईडीने नागपूरमध्ये केली 3 जणांची गुप्त चौकशी
- एनआयए कडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक, आजच सेशन कोर्टात हजर करणार
- ‘आजच्या चर्चेतून हवा तो तोडगा निघाला नाही, तर काय होईल हे सांगायची गरज नाही’