मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूने निकाल दिला. त्या निकालावर शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात आंनद साजरा करण्यात आला तर ठाकरे गटाने निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्याच आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात केली आहे.
हेही वाचा….मोठी बातमी…! “एक फोन आला अन्…. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र तसेच शिवसेना पक्षा संदर्भात शिंदेंच्या बाजूने निकाल दिला. यावेळी नार्वेकरांनी शिवसेनेच्या कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र केले नाही. तर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांचा व्हीप मान्य करण्यात आला. विशेषता : भरत गोगावले यांचा व्हीप सर्वोच्च न्यायालयाने रद्द अवैध ठरवला होता. त्याच संदर्भात आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धाव घेतली आहे.
हेही वाचा…“मोदी नकोच, अन् मोदींसोबतचे ढोंगीपण नको, “शिवसेनेच्या धर्मवीरांच्या ठाण्यात लागले बॅनर
दरम्यान, याआधी कायदेशीर प्रक्रियेत सुप्रीम कोर्टाचा अपमान झाला असल्याचं पत्र ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात देखील दिला होता. शिवसेनेच्या धनुष्यबाणासंदर्भात देखील ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. यातच आता सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर कधी सुनावणी होणार ? आणि कोर्ट यावर काय निकाल देणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा….“अकोला लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकरांना सोडली,” केंद्रीय राज्यमंत्र्यांचं मोठं विधान
हेही वाचा…५० लोकांचा ताफा सोबतीला अन् त्यांच्यासाठी ३४ कोटींचा खर्च ; मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा चर्चेत
हेही वाचा…“गेम केला मास्टरमाईंडला सांगा,” शरद मोहोळ प्रकरणातील खऱ्या मास्टरमाईंटला अटक
हेही वाचा…मिलिंद देवरांच्या प्रवेशामुळे दक्षिण लोकसभेची गणितं बदलली, भाजप दावा सोडणार, सावंत विरूद्ध देवरा असा सामना होणार
हेही वाचा…“२६ जानेवारीला मराठा आंदोलन मुंबईत धडकणार ,” कुठे मुक्काम कुठे जेवण ? जरांगे पाटलांनी दिली माहिती