पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळचा कोथरूड भागात गोळी झाडून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर आठ तासातच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व त्याचा मामा नामदेव कानगुडे याच्यासह आठ जणांना ताबोडतोब अटक करण्यात आली. यामध्ये दोन वकिलांचाही समावेश होता. जमिनीच्या वादातून मुन्ना पोळेकर व त्याचा मामा नामदेव कानगुडे यांनी हत्या केल्याची सुरूवातीला चर्चा होती. मात्र पोलीस तपासात आणखी एका मास्टर माईंटला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा…शरद मोहोळ हत्याप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला अटकेत, पनवेलच्या फार्महाऊसवर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
शरद मोहोळ प्रकरणात शरद मोहोळची हत्या केल्यानंतर मुन्ना पोळेकर याने संतोष कुरपे याला फोन केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. शरद मोहोळची हत्या केल्यानंतर पोळेकर आपल्या साथीदारांसह कोल्हापुरच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्यांनी एक सीमकार्ड घेऊन त्यावरून संतोष कुरपे याला फोन करून गेम केला मास्टरमाईंडला सांगा असे सांगितले होते. यानंतर पोलिसांनी संतोष वरपेला अटक केली.
हेही वाचा..उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार ? भाजपने दिले चॅलेंज
दरम्यान, संतोप वरपे याची पोलिसांनी चौकशी केली असता. त्याने याप्रकरणातील मुख्य आरोपी रामदास मारणे याच नाव घेतले. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन लावून रामदास मारणेला पनवेलमधील फार्महाऊसवर जाऊन अटक केली. त्याच्यासोबत इतर सहा जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे शरद मोहोळचा खून जमिनीच्या वादातून नाही तर गॅगवार मधून झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याआधी मोहोळ विरूद्ध मारणे टोळी असा वाद रंगला होता. मारणे टोळीने संदीप मोहोळचा खून केला होता. त्यानंतर त्या खूनाचा बदल शरद मोहोळने घेतला. व आता शरद मोहोळचा खून करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाचे आतापर्यंत धागेदोरे मारणे टोळीपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे पोलिसाच्या तपासात काय माहिती मिळणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मिलिंद देवरांच्या प्रवेशामुळे दक्षिण लोकसभेची गणितं बदलली, भाजप दावा सोडणार, सावंत विरूद्ध देवरा असा सामना होणार
हेही वाचा…“२६ जानेवारीला मराठा आंदोलन मुंबईत धडकणार ,” कुठे मुक्काम कुठे जेवण ? जरांगे पाटलांनी दिली माहिती
हेही वाचा.मोठी बातमी…! “एक फोन आला अन्…. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
हेही वाचा…“मोदी नकोच, अन् मोदींसोबतचे ढोंगीपण नको, “शिवसेनेच्या धर्मवीरांच्या ठाण्यात लागले बॅनर
हेही वाचा…“छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्रीराम सेवक आणि कारसेवक”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं