मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र तसेच नाशिक दौरा, राम मंदिर, तसेच शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावरून उद्धव ठाकरे सातत्याने भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडत आहेत. त्याला भाजपकडून देखील ठाकरे गटावर जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांनी सात जन्म घेतले तरी ते देवेंद्र फडणवीसांशी बरोबरी करू शकणार नाहीत. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तर आमदार आशिष शेलार यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
हेही वाचा…“..तर शरद मोहोळ वाचला असता,” पोलिस तपासात मोठी माहिती समोर
उद्धव ठाकरे स्वत : ला घरंदाज, कुटुंबप्रमुख म्हणणार असतील त्यांना माझा सवाल आहे. जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो, जर तुम्ही तुमच्या सख्खा बहिणीला घरातून बाहेर काढता, जर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही, जर वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला न्यायालयात जावे लागते तर तुम्ही कुटुंबप्रमुख आणि घरंदाज कसे? त्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका. असे म्हणत आशिष शेलारांनी ठाकरेंवर टिका केलीय.
हेही वाचा…काळाराम मंदिराच्या सफाईसाठी ८ ते १० लाख खर्च..! मोदींना साफ सफाई करण्याची गरज होती काय ?
मोदींचे कुटुंब आणि मोदींचे घर १४० कोटी जनता आहे. स्वत: च्या परिवारापेक्षा देश हा परिवार मानणे ही त्यांची भूमिका आणि माझे कुटुंब माझा परिवार ही तुमची भूमिका कुठे ? यासाठी तुम्ही क्लासेस लावावी लागते. मी चाटे क्लासेसला याबाबत जरून विनंती करेन, असा टोलाही शेलारांनी ठाकरेंना लगावला. शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. उद्धव ठाकरे यांचे भाषण त्यांना आलेले नैराश्य दाखवत आहे. कल्याण डोंबिवली शहरात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची एक जागा निवडून आणून दाखवावी. मर्दांचा पक्ष उबाठा असेल तर त्यांनी स्वत ; किंवा स्वत:च्या सुपुक्षाला लोकसभेला निवडून आणून दाखवावे. असे चॅलेज देखील भाजपने ठाकरेंना दिले.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जून खर्गे तर संयोजकपदी नितीश कुमारांची नियुक्ती
हेही वाचा…“मोदींना महान म्हणायचे फक्त पाकिस्तान अन् उद्धव ठाकरेच राहिले”, भाजपच्या बड्या नेत्याचं विधान
हेही वाचा…“गद्दारांना पाताळात असं गाडायचं की डिपॉझिट जप्त झालं पाहिजे”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…मनसेच्या ताब्यातील सर्वोकृष्ट ग्रामपंचायतीला राज ठाकरेंकडून ५ लाखाचं बक्षीस जाहीर, म्हणाले…
हेही वाचामला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण… : शरद पवारांचं मोठं विधान