पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या खुनाचा कट हा मुख्य सुत्रधार साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने रचला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो मोहोळचा खून करण्याची संधी शोधत होता. मोहोळचा खून करण्यासाठी रचलेल्या कटात सामील होण्यास नकार दिल्याने पोळेकराने भूगाव परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाल्या होत्या. त्या गोळीबारात जखमी झालेल्या तरूणावर एका डॉक्टरने उपचार केले. मात्र, त्या डॉक्टरने पोलिसांना याबाबतची माहिती दिली नाही. जर तेव्हा पोळेकरने केलेल्या गोळीबाराचा प्रकार उघडकीस आला असता तर मोहोळ वाचला असता अशी माहिती पोलिसात तपासात उघडकीस आली आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभा जिंकायचीय मग हे निकष पार पाडा, भाजपच्या इच्छूक उमेदवारांना दिले आदेश
शरद मोहोळला संपवण्यासाठी रचनेत आलेल्या कटात मुळशीतील तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिन्ही आरोपींनी शरद मोहोळला संपवणारा मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याला पैसे दिल्याचे तपासामध्ये उघड झालं आहे. या तिन्ही आरोपींना रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची चौकशी केली जात आहे. यामध्ये आदित्य गोळे, नितीन खैरे याच्यासह आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा…“१० वर्षापुर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्यांची चर्चा होत होती, मात्र आता…”मोदींचा काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान, मुन्ना पोळेकर याने ज्याठिकाणी पिस्तूल चालवण्याचा सराव केला होता. त्याठिकाणी हे आरोपी उपस्थित असल्याचीही माहिती पुढे आली आहे. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांनी १७ डिसेंबरला भूगावमध्ये एकावर गोळीबार केला होता. याचं कारण म्हणजे त्याने शरद मोहोळ याला संपवण्यासाठी मदत केली नाही म्हणून त्याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी बंड गार्डन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काळाराम मंदिराच्या सफाईसाठी ८ ते १० लाख खर्च..! मोदींना साफ सफाई करण्याची गरज होती काय ?
हेही वाचामहायुती सरकारचा ८००० कोटीचा महाघोटाळा ; वडेट्टवारांनी पुरावा देत घोटाळा केला उघड
हेही वाचा“मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही!” उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…“आधी मटका अड्ड्यावर छापा, मग बोलवले पोलिसांना”, भाजपच्या माजी महिला आमदाराची एकच चर्चा