पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ याचा कोथरूड परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर पोलीस तपासात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. यातच आता शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा…मनसेच्या ताब्यातील सर्वोकृष्ट ग्रामपंचायतीला राज ठाकरेंकडून ५ लाखाचं बक्षीस जाहीर, म्हणाले…
शरद मोहोळ हत्या प्रकरणी पनवेलमधून मुख्य आरोपी रामदास मारणे याच्यासह त्याच्या ८ साथिदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल येथून रामदास मारणे याच्यासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील तीन आरोपी मुख्य असून तीन जण संशयास्पद असल्याने त्यांनी ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई असून पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा..मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण… : शरद पवारांचं मोठं विधान
दरम्यान, कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणाचा उलगडा आता दिवसेंदिवस होतांना दिसत आहेत. मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मुळशीत गोळीबाराचा सराव केला होता. त्याच्यासोबत आणखी दोघे जण सरावाच्या वेळी उपस्थित होते. तर याआधी मुन्ना पोळेकर याचा मामा तसेच दोन वकिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“निमंत्रण असूनही काॅंग्रेस राम मंदिराच्या कार्यक्रमाला का जाणार नाही ?” शरद पवारांनी सांगितलं कारण म्हणाले..
हेही वाचा..उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार ? भाजपने दिले चॅलेंज
हेही वाचा…मोठी बातमी..! इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जून खर्गे तर संयोजकपदी नितीश कुमारांची नियुक्ती
हेही वाचा…“मोदींना महान म्हणायचे फक्त पाकिस्तान अन् उद्धव ठाकरेच राहिले”, भाजपच्या बड्या नेत्याचं विधान
हेही वाचा…“गद्दारांना पाताळात असं गाडायचं की डिपॉझिट जप्त झालं पाहिजे”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल