पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. घराणेशाही आली आहे. ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? असा सवाल करत शरद पवारांनी अनेक उत्तरं दिलीत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नसल्याचेही शरद पवारांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा..मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण… : शरद पवारांचं मोठं विधान
पुण्यातील जुन्नरमध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शऱद पवार यांनी शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही. पण मी जाणार . मात्र २२ जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाणार, श्रीराम हे सर्वांचे आहेत. असेही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा…“..तर शरद मोहोळ वाचला असता,” पोलिस तपासात मोठी माहिती समोर
काॅंग्रेसवर टीका केली जाते की काॅंग्रेस उद्घाटनाला जाणार नाही. काॅंग्रेस जात नाही असं नाही. काॅंग्रेसचं मत आहे की, ते मंदिर अपूर्ण आहे ते पुर्ण करा. अर्थवट कामाला येऊ नका. मंदिर पुर्ण होण्याच्या पुर्वी लोकसभेत निवडणुका नजरेसमोर ठेऊन हे उद्योग आहेत. हे राजकीय हेतूने सर्वकाही आहे. त्यामुळे लोकांना त्यासंबंधीची नाराजी आहे. कुणाचाही राम मंदिराला विरोध नाही. असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभेबाबातही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. भंडारा गोंदियाच्या जागेबाबत अजून चर्चा झाली नाही. बैठकीत राजकीय पातळीवर चर्चा झाली. संयोजकाची जबाबदारी नितीश कुमार यांनी घ्यावी असं ठरवलं आहे. आज जी राष्ट्रीय पातळीवरची चर्चा झाली. त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा झाली नाही. असेही शरद पवारांनी सांगितले
READ ALSO :
हेही वाचा..उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार ? भाजपने दिले चॅलेंज
हेही वाचा…मोठी बातमी..! इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जून खर्गे तर संयोजकपदी नितीश कुमारांची नियुक्ती
हेही वाचा…“मोदींना महान म्हणायचे फक्त पाकिस्तान अन् उद्धव ठाकरेच राहिले”, भाजपच्या बड्या नेत्याचं विधान
हेही वाचा…“गद्दारांना पाताळात असं गाडायचं की डिपॉझिट जप्त झालं पाहिजे”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…मनसेच्या ताब्यातील सर्वोकृष्ट ग्रामपंचायतीला राज ठाकरेंकडून ५ लाखाचं बक्षीस जाहीर, म्हणाले…