अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिर्डी येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहे. यामधे निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण सुद्धा त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. परंतु त्याआधी निळवंडे कालव्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी यावरून मोदींना खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…नाशिकचा अमन परदेशी सुषमा अंधारेंच्या विरोधात मानहाणीचा दावा ठोकणार, अंधारेंचं ‘ते’ आरोप तथ्यहीन
दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार आहे. याचा आनंद मला आज होत आहे. १९७० ते २०१९ पर्यंत निळवंडे धरणाऱ्या कालव्याच्या कामासाठी सुमारे ११०० कोटी रूपये खर्च करून केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षात कालखंडात जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुमारे ९०० कोटींचा निधी देऊन मी या कालव्याचे ९० टक्के काम पूर्ण केले असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक..! बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘या’ दिवशी अन्नत्याग उपोषण करणार
निळवंडे प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मी स्वत: या कार्याची तीनदा जाऊन पाहणी केली होती. महाविकास आघाडी मधील तेथील लोकप्रतिनिधींनी या कामात बारकाईने लक्ष घातले. कोरोनाच्या काळात सरकारी तिजोरीवर आर्थिक भार होता, मात्र त्या परिस्थितीतही आम्ही विकास कामे थांबवली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम एका निर्णयाक टप्प्यावर आणून ठेवले आहे. मोदीजी आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील शिर्डी येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण सुद्धा करण्यात येणार असल्याचे समजले. दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार… pic.twitter.com/1KCNFybuIG
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा, वाहनांची तोडफोड केल्यानंतर सदावर्तेंची मागणी”
हेही वाचा…“राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा”, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे गटाची उद्या सत्व परिक्षा, नार्वेकर उद्या मोठा निर्णय घेणार ?
हेही वाचा…“तर मोदींच्या नगरच्या सभेत एकाच वेळी ५ हजार कार्यकर्ते उभं राहून जाब विचारणार”, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह फडणवीस दिल्लीला रवाना