मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तीन तरूणांनी सदावर्ते यांच्या घराच्या खाली येऊन गाड्यांची तोडफोड केली आहे. यावरून त्या तीन तरूणांना पोलिसांनी अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का ? असा सवाल करत मनोज जरांगे पाटलांना अटक करा, अशी मागणी गुणरत्ने सदावर्ते यांनी केली आहे.
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक..! बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘या’ दिवशी अन्नत्याग उपोषण करणार
घराच्या खाली वाहनांची तोडफोड झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी खाली येऊन वाहनांची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर गुणरत्ने सदावर्ते यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना मोठा संताप व्यक्त केला आहे. माझ्या घरासमोर येऊन काही लोकांची रेकी केली होती. एका चॅनलले हे दाखवलं आहे. हे षडयंत्र आहे. मी थांबणार नाही. मी विद्यापीठ आणि कॉलेजात जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. माझं सरकारला म्हणणं आहे, एकट्या जरांगे पाटलांचे ऐकू नका. आमचंही ऐका. जरांगेचे लाड थांबवले नाही तर मीही प्राणांतिक उपोषण करणार. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा…“तर अजित पवारांना कारखान्यात घुसू देणार नाही,” बारामतीतच अजित पवारांना घातली बंदी, दिला इशारा
दरम्यान, मला धमक्याही देण्यात आल्या असून त्याचे व्हिडीओ कॉल आहेत. सोशल मीडियावरून धमक्या देण्यात आल्या आहे. काही दिवसांपुर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो त्यावेळी त्यांनी माझ्यासमोर ज्वॉंईट पोलिस ऑफ कमिशनरला फोन लावला होता. एक कॅबिनेट मंत्र्याने डीसीपी चिमटे यांना फोन केला. म्हणजे पोलिसांकडे माहिती होती. तरीही पोलिसांसमोर येऊन वाहनांची तोडफोड केली. माझ्या घरात घुसण्याचाही हल्लेखोरांचा प्रयत्न होता. असा गंभीर आरोप देखील लावण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा”, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे गटाची उद्या सत्व परिक्षा, नार्वेकर उद्या मोठा निर्णय घेणार ?
हेही वाचा…“तर मोदींच्या नगरच्या सभेत एकाच वेळी ५ हजार कार्यकर्ते उभं राहून जाब विचारणार”, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह फडणवीस दिल्लीला रवाना
हेही वाचा…नाशिकचा अमन परदेशी सुषमा अंधारेंच्या विरोधात मानहाणीचा दावा ठोकणार, अंधारेंचं ‘ते’ आरोप तथ्यहीन