अहमदनगर : राज्यात मागील काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदनगर दौरा असून शिर्डी त्यांची सभा होणार आहे. या सभेत मोदींनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडावी अन्यथा सर्वजण एकाच वेळी उठून उभे राहतील अन् जाब विचारतील, असा इशारा संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाने दिला आहे.
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शिर्डित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपुजने होणार आहे. यानिमित्ताने नरेंद्र मोदी शेतकऱ्यांची संवाद साधणार आहे. या सभेत नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडावी, अन्यथा सभेत उपस्थित असलेले ५ हजार कार्यकर्ते सभेत एकाचवेळी उभे राहतील व जाब विचारतील असे संभाजी ब्रिगडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत व ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
दरम्यान, मंगळवारी जामखेड येथे खासदार सुजय विखे पाटली यांनी पंतप्रधानांच्या सभेच्या नियोजनासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत उपस्थित राहून आपण ही भूमिका खासदार विखे यांना सांगितली. त्यावर त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधानांच्या कानावर घातला जाईल असे आश्वासन दिले असल्याचे आण्णासाहेब सावंत यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह फडणवीस दिल्लीला रवाना
हेही वाचा…नाशिकचा अमन परदेशी सुषमा अंधारेंच्या विरोधात मानहाणीचा दावा ठोकणार, अंधारेंचं ‘ते’ आरोप तथ्यहीन
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक..! बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘या’ दिवशी अन्नत्याग उपोषण करणार
हेही वाचा…“तर अजित पवारांना कारखान्यात घुसू देणार नाही,” बारामतीतच अजित पवारांना घातली बंदी, दिला इशारा
हेही वाचा…मनोज जरांगे यांना बळ देण्यासाठी संभाजी राजेंचं कर्तव्य, विनंती केली लगेचच अन् लगेचच झाली मान्य