मुंबई : दिंडोशी सत्र न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी मोहन चौहानला दोषी ठरविले आहे. या प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. यावर आता गृहमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यसभा निवडणुक; नवाब मलिक, अनिल देशमुखांसाठी अजित पवार न्यायालयात जाणार ?
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक ददृ होईल तसेच याद्वारे महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलीस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश समाजात पोहोचावा अशी अपेक्षा देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
“संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी उत्तर देणार का?” सभेआधी मुख्यमंत्र्यांना मनसेने डिवचलं
साकीनाका बलात्कार आणि हत्याप्रकरणी मोहन चौहान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने 34 वर्षीय महिलेवर रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या वाहनात बलात्कार करून पीडितेची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. तसेच आरोपीला फाशी देण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात होत होती.
“मोदींच्या नेतृत्वाखाली एक छोटासा सैनिक म्हणून काम करणार”; हार्दिक पटेल
गेल्या वर्षी साकीनाका याठिकाणी ही घटना घडली होती. घटना घडल्यानंतर पीडित महिलेला तातडीने राजावाडी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिचा उपचारादरम्यानच दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आज त्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली असता. त्याला न्यायालायने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Read also:
- “छगन भुजबळ OBC आरक्षणावरून तोंडघशी पडतील; आघाडीच्या एका गटाला आरक्षण नकोय”
- भाजपचा ‘जल आक्रोश’ अखेर मुख्यमंत्र्यांनी ऐकला, औरंगाबादचा पाणी प्रश्न सुटणार..
- “राज्यसभेच्या निवडणुकीसारखं, विधान परिषदेच्या निवडणुकीतही ‘भाजप’ आघाडीला रडवणार”
- भाजपचे महाडिक विजयी होणार, आणि महाविकासआघाडीचा बडा नेता घरी बसणार
- राज्यसभा निवडणूकिसाठी फडणवीसांची मोर्चेबांधणी, अपक्ष आमदरांना गळाला लावणार?