मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांची धावपाळ समजून आहे. मात्र आघाडीतील इतर नेत्यांना ओबीसी आरक्षण पाहिजे आहे की नाही? असा सवाल आहे. मग जर असं नसतं तर सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरीकल डेटा तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता. तेव्हा मग का केलं नाही. त्यांनी फक्त अडीच वर्ष वेळ घालवला. त्यामुळे छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणावरून तोंडघशी पडतील, असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
“संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी उत्तर देणार का?” सभेआधी मुख्यमंत्र्यांना मनसेने डिवचलं
महाविकास आघाडी सरकारमधील पडद्यामागील एक गट आहे. त्याला ओबीसी आरक्षण नको आहे. तर एक गट ओबीसी आरक्षणासाठी सक्रिय आहे. छगन भुजबळांना ओबीसी आरक्षणासाठी खुप मेहनत घेत आहेत. मात्र दुसऱ्या गटाला ओबीसी आरक्षण नको आहे. जर सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल तर अयोगाच्या भूमिकेवर शंका आहे, तसेच आयोगाला अलिखित आदेश आहेत. असंही ते म्हणाले.
“मोदींच्या नेतृत्वाखाली एक छोटासा सैनिक म्हणून काम करणार”; हार्दिक पटेल
ज्यावेळी राज्यात ओबीसी आरक्षणाच्या निवडणुका लागतील. त्यावेळी ओबीसी समाजासाठी जे आरक्षण ठरवून दिलं आहे. ते त्यांना आम्ही देऊ. तसेच मध्यप्रदेशच्या धर्तीवर ज्यापद्धतीने त्यांना निवडणुकीत मदत झाली आहे. त्या पद्धतीने आम्ही तो निर्णय घेणार आहोत. ओबीसी आरक्षणासंदर्भात कमिटीच्या मार्फत इम्पिरीकल डाटा गोळा करण्याचं काम चालू आहे. असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘राष्ट्रवादीचा जलवा’ ; आमदार सुनील शेळकेंनी जिंकली 12 लाखांची बोलेरो
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जो डाटा उपलब्ध होता तो डाटा राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगामार्फत सादर केला पण दुर्दैवाने तो देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आणि आपल्याबरोबर मध्यप्रदेश राज्य सरकारला देखील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास सांगितले. पण मधल्या काळात मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्याची परवानगी दिली. आता हाच न्याय महाराष्ट्राला सुद्धा मिळाला पाहिजे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
Read also:
- भाजपचा ‘जल आक्रोश’ अखेर मुख्यमंत्र्यांनी ऐकला, औरंगाबादचा पाणी प्रश्न सुटणार..
- “राज्यसभेच्या निवडणुकीसारखं, विधान परिषदेच्या निवडणुकीतही ‘भाजप’ आघाडीला रडवणार”
- भाजपचे महाडिक विजयी होणार, आणि महाविकासआघाडीचा बडा नेता घरी बसणार
- राज्यसभा निवडणूकिसाठी फडणवीसांची मोर्चेबांधणी, अपक्ष आमदरांना गळाला लावणार?
- राज्यसभा निवडणुक; नवाब मलिक, अनिल देशमुखांसाठी अजित पवार न्यायालयात जाणार ?