जळगाव : काँग्रेसकडून सातत्याने स्वबळाचा नारा देणारे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, हे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी, पक्ष संघटनेचा आढावा घेतला, तसेच जिल्ह्यातील फैजपूर इथे, मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यांची त्यांच्या उपस्थितीत होळी करण्यात आली. यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, प्रदेश उपाध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आदींची उपस्थिती होती.
हे पण वाचा, शिवसेनेने बांधले घड्याळ, राष्ट्रवादीने उचलला बाण, नव्या युतीचा मुहूर्त ठरला
“सत्ता नागरिकांच्या सुरक्षेसाठी असली पाहिजे, दुराचारासाठी नाही. मात्र, भाजप ज्या पद्धतीने देशात दुराचार माजवत आहे. त्या विरोधात केवळ सामान्य जनतेच्याच मनात नाही, तर काँग्रेसजन असलेल्या सर्वांच्याच मनात आग पेटली आहे, ही आग बाहेर यायला जास्त वेळ लागणार नाही, आणि ही आग जेव्हा बाहेर येईल, तेव्हा ती भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही,” असं हल्लबोल करत, “मोदी सरकार इंग्रजांपेक्षाही अत्याचारी आहे,” असा घणाघात त्यांनी मोदी सरकारवर केला आहे.
हे पण वाचा, मुख्यमंत्र्याचा विदेशात काळा पैसा; त्यांच्याच आशिर्वादाने मला अडकवण्याचा डाव, राणा दाम्पत्याने केले आरोप
तसेच, “या अत्याचारी मोदी सरकारने, शेतकऱ्यांच्या विरोधात जे ३ काळे कृषी विषयक कायदे आणले आहेत. त्या काळ्या कायद्यांचं दहन करायला मी आज, फैजपुरात आलो आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या ६ महिन्यांपासून शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहेत. मात्र, सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला देखील तयार नाही, याचा निषेध म्हणून, त्या ३ काळ्या कायद्यांची प्रतिकृती तयार करून आज त्याचे दहन केले जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा, भाजपाला दे धक्का; महापौरांसह तब्बल ३९ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत?
यावेळी त्यांनी, “भाजपच्या विरोधात कोणत्याही प्रकारची आघाडी, ही काँग्रेसशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आमचा पक्ष युपीएचे हृदय आहे. त्यामुळे, काँग्रेसला सोडून कुठलीही तिसरी आघाडी होणार नाही,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
Read Also :
- काँग्रेस स्वबळावरच लढणार, आम्ही शब्द दिलाय, आता माघार नाही – नाना पटोले
- ओबीसी नेत्यांच्या घोषणा ठरल्या फोल; आता वडेट्टीवार, बावनकुळे काय करणार?
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा हा तर ओबीसींवर घोर अन्याय; पंकजा मुंडे म्हणतात…
- राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का; टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्थगित!
- आरटीओ कथित भ्रष्टाचार प्रकरण: परिवहन मंत्री अनिल परबांना पोलिसांकडून क्लिन चीट