गोंदिया: “नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर विश्वास ठेवतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नसतो. पुरामुळे मृत्यू झालेल्या आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम नारायण राणे यांनी करू नये,” असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांचे नाव न घेता लगावला. ते गोंदियात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याची पूरस्थिती तसेच इतर विषयांवर सविस्तर भाष्य केले.
हे पण वाचा: एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात
राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. त्यानंतर याच वक्तव्याचा आधार घेत नाना पटोले यांनी राणे यांच्यावर पलटवार केला. “नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर विश्वास ठेवतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नाही. मात्र, पुरामुळे अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांवर कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करु नये. तसेच मृतक आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये, असे नाना पटोले म्हणाले.
हे पण वाचा: दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासोबत चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. यावेळी पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर टीका केली. “राज्यात संकटं येत आहेत. त्याला कारण मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. ते आल्यापासून वादळं काय, पाऊस काय, कोरोना काय… सगळं चालूच आहे. कोरोना ही त्यांची देण आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, अशी खोचक राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर
Read Also :
- नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर चालणारा पक्ष, महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नाही
- दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
- हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
- परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
- आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय