मुंबई : गेले चार दिवस विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहे. आज मात्र या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी आक्रमक भुमिका घेतली. सत्ताधारी आमदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. बीएमसीचे खोके- मातोश्री ओके, लवासाचे खोके- बारामती ओके अशा घोषणा सत्ताधारी पक्षाकडून देण्यात आल्या. यानंतर विरोधी पक्षाचे आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पाचवा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापसून विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. या घोषणाबाजी वरून सभागृहात देखील दोन गटांत चांगलच वाद झालेला पाहायला मिळाला होता. त्यातच आज भाजप व शिंदे गटाच्या आमदारांनी आज विरोधी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर विरोधी पक्षाचे आमदार व सत्ताधारी आमदार यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.
“दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, आता हे मंगळागौरीला पण देतील”; राज ठाकरेंचा शिदेंना टोमणा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यावर आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बांजूच्या नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायऱ्यावर मोठा राडा बघायला मिळाला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विरोधक बंडखोर आमदारांवर तुटून पडत जोरदार घोषणाबाजी करत आहेत. . बीएमसीचे खोके मातोश्री ओके, अशा घोषणाबाजी देत शिंदे- फडणवीस गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी दिली. तसेच लवासाचे खोके बारामती ओके अशा घोषणा देऊन त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला. वाझेंचे खोके, मातोश्री ओके..बीएमसीचे खोके, मातोश्री ओके..लवासाचे खोके, बारामती ओके..अशी घोषणाबाजी सत्ताधारी पक्षाने करत शिवसेना आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. यावेळी विधानभावनाच्या पायऱ्यांवर केलेल्या घोषणाबाजीवरून चांलच राजकीय वातावरण तापलेलं आहे. याचा आता विधिमंडळात काय प्रभाव पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
“माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो”
यापुर्वी, शिंदे-फडणवीस सरकारणे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा.. अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत करा, पन्नास खोके.. एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, आले रे आले गद्दार आले, अशा घोषणा देत पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केलं आहे.
Read also
- “शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका”, मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना भावनिक साद
- एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील 18 मंत्र्यांना बंगले जाहीर; पाहा संपुर्ण यादी
- “शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या, त्यामुळेच शिंदे गटात”; सेनेचा माजी आमदार शिंदे गटात
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
- “शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?