मुंबई : राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललीत. आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. परंतु राज्यात अजूनही महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीय. यातच आता राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी भाजपला ३२, शिवसेना शिंदे गटाला १२ तर अजित पवार गटाला ४ जागा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु यावर आता शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहे.
हेही वाचा…मुंबईतील चार लोकसभेसाठी ठाकरेंचे ‘हे’ शिल्लेदार ठरले, भाजप अन् शिंदे गटाला देणार मात ?
जागावाटपावर शिंदे गटातील खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपवर उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला १२ जागांचा फॉर्म्युला मान्य नाही. २०१९ च्या आकडेवारीनुसार आमचा क्लेम २२ जागांचा आहे. त्यावेळी भाजपने २६ जागा लढवल्या होत्या. तेव्हा भाजपने तीन खासदार, तर आमचे चार खासदार पराभूत झाले होते. पण आता आमच्यात एक नवीन सहकारी आलाय. त्यांना थोड्या जागा द्याव्या लागतील. त्यामुळे या जागा शिवसेना आणि भाजपने आपापल्या कोट्यातून समसमान पद्धतीने द्याव्यात. असेही त्यांनी म्हटलेय.
हेही वाचा…जरांगेंच्या मुलांमध्येही अंहकार, पाच गुप्त बैठका, अजय महाराजांचे जरांगेंवर काय काय आरोप ?
महायुतीत तसेच महाविकास आघाडीत सध्या जागावाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे. आघाडीत ४८ पैकी ४० जागांवर समन्वय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर फक्त ८ जागांचा पेच शिल्लक राहिलाय. तर दुसऱ्या बाजूला महायुतीत अजूनही कुठलाच फॉर्म्युला ठरलेला नसल्याचे दिसत आहे. परंतु शिवसेना शिंदे गटाने १८ जागांवर आपला दावा कायम ठेवला आहे.
दरम्यान, आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, १२ जागांचा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही. सध्या महायुतीच्या जागावाटपाच्या ज्या फॉर्म्युलाची चर्चा होत आहे. त्याची अधिकृत चर्चा झाली नाही. परंतु लोकसभा जागावाटपाची चर्चा कोण करतंय ? त्याबाबत कोण निर्णय घेतंय, हे कळायला काहीच मार्ग नाहीय. मी एक नेता आहे. शिवसेनेची भूमिका ठरवतांना माझ्यासोबत असणाऱ्या नेत्यांशी मुख्य नेते जागावाटपाची चर्चा करत असतील तर अशी अपेक्षा आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा“७०० जणांना विषबाधा, रूग्णांवर रस्त्यावरच उपचार,” राज्याचे विरोधी पक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले…
हेही वाचा…“जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढलीय, तो आता थांबणार नाही”, भुजबळांचा जरांगेंवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा….“जरांगे पाटलांमुळे महिलांवर शाब्दिक ब’ला’त्का’र होताहेत,” बारसकरांनंतर जरांगेंच्या आणखी एका महिला सहकाऱ्याचे आरोप
हेही वाचा.“आता भाजपच्या D फॉर दलालीवर आवाज उठवण्याची हिंमत दाखवतील का?”, रोहित पवारांचा अजित पवार गटाला सवाल
हेही वाचा…“महानंद आता गुजरातला विकलेय”, आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ