मुंबई : दावोस येथील आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावून महाराष्ट्रात कोट्यावधी रूपायांची गुंतवणुक महाराष्ट्रात आणली. या दरम्यान जगभरातील अनेक उद्योगपतींनी महाराष्ट्राशी करार केल्याने येथील तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, अशी आशा शिंदेंनी व्यक्त केला. मात्र एकनाथ शिंदे यांनी दावोस मध्ये ज्या कंपन्यांशी करार केला. त्यातील तीन कंपन्या ह्या महाराष्टाच्याच असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून काॅंग्रेसच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
“BMC ची 3 हजार कोटीची एफडी शिंदे फडणवीसांनी मोडली, मोदींना तशी परिस्थिती करायचीय का?”
एकनाथ शिंदे यांनी दावोसमध्ये अमेरिकन कंपनी न्यू एज क्लिनटेक सोल्युशन प्रा. लि. ह्या कंपनीशी करार केला. मात्र ही कंपनी इटखेडा, औरंगाबादची असून तिची नोंदणी 2 जून 2022 रोजी झाली आहे. तर दुसरी फेरो अलॉय प्रा. लि. ही कंपनी इंग्लडची असल्याचे दर्शविले आहे. मात्र ही कंपनी जालन्यातील असून तीची 17 जुलै 2017 रोजी या कंपनीची नोंदणी करण्यात आली आहे. तर तिसरी राजुरी स्टील अॅंड अलॉय इंडिया प्रा. लि. ही कंपनी इस्त्रालय /युरोपची असल्याचे नमुद आहे. ही मुळ चंद्रपुर जिल्ह्यातील आहे.
मोदींचा मुंबई दौरा..! बीकेसीच्या भाषणांतून मोदींनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले
यावरून आता नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दावोस येथे सामंजस्य करार केल्या कंपन्या पुर्वीपासून महाराष्ट्राच्याच आहेत. परंतू प्रसिद्धीसाठी त्या परदेशी असल्याचं सांगून इडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेची फसवणुक केलीय. स्वत: च्या स्वार्थासाठी जनतेच्या डोळ्यात धुळ फेकणाऱ्या गद्दार सरकारला जनता माफ करणार नाही. अशी खोचक टिप्पणी नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
दावोस येथे सामंजस्य करार केल्या कंपन्या पूर्वीपासून महाराष्ट्राच्याच आहेत. परंतू प्रसिध्दीसाठी त्या परदेशी असल्याच सांगून ईडी सरकारने माहाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या गद्दार सरकारला जनता माफ करणार नाही. pic.twitter.com/GkO1kOdoOA
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 20, 2023
Read also
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर
- “याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार, गेले, पक्षाची शकले उडाली”; भाजपची राऊतांवर टिका
- मुंबई महापालिका निवडणुक…! भाजप-शिंदेंच्या ट्रिपल इंजिनचा डाव ठाकरे गट रोखणार का?
- कसब्यातील पोटनिवडणुक गाजणार..! काॅंग्रेस अन् भाजपमध्ये जोरदार लढत ?
- “मोदींचं भाषणं ऐकून मिठी नदीही हसली असेल अन् खारा समुद्रही गोड झाला;” राष्ट्रवादीने डिवचलं