मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. राज्यपालांच्या अधिकाराबाबत बोलू शकत नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार महाविकास आघाडीचा आहे, असंही ते म्हणालेत.
“खडसे कुटुंबाकडून माझ्या जीवाला धोका”; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
राज्यपालांनी दोनदा वेळ दिली होती. त्याचवेळी निवडणूक होऊ शकली असती. पण आता हे वेळ मागत आहे. हा राज्यपालांचा अपमान होता. त्यावर सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू शकते. पण मी त्यात जात नाही हा राज्यपालांचा अधिकार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. राज्यपाल हे स्वायत्त पद आहे, त्यांनी काय करायचं हे तेच ठरवतील, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
त्यांच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या पद्धतीवरून त्यांची अक्कल कळते; राणेंची पवारांवर घणाघाती टीका
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काल राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली असून सही करण्याची विनंती केली आहे. पण राज्यपालांनी थोडा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तानाजी सावंत भाजपच्या वाटेवर? पंढरपुरात केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ
विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली आहे. काल महाविकास आघाडीचे नेते शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात राज्यपालांनी चर्चा केली.
Read also:
- नितेश राणेंना अटक होणार? मंत्री नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया…म्हणाले…
- नितेश राणेंना “म्याव म्याव” प्रकरण चांगलंच भोवलं; भास्कर जाधवांकडून निलंबनाची मागणी
- “सरकार हरवलं आहे”चा सदरा परिधान करत मंगेश चव्हाणांची आघाडी सरकारवर टीका
- दिवंगत सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेना घेणार – एकनाथ शिंदे
- राष्ट्रवादीचे पार्थ पवार लोकसभा निवडणूक आता शिरुरमधून लढणार? अजित पवारांची २०२४ साठी मोठी रणनिती