पुणे : महाराष्ट्रातून वेदांता प्रकल्प बाहेर जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र नेहमी प्रथन क्रमांकावर राहिला होता. केंद्रांतील सत्तेचा लाभ गुजरातला होत आहे. त्यामुळेच गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येणं शक्य नाही. अशातच सगळीकडे काय झाडी काय डोंगरची चर्चा, राज्याकडे कोणाचं लक्ष आहे का? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केला आहे.
“सुप्रिया सुळेंना सत्ता गेल्याचं दु:ख झालं आहे”; सुधिर मुनगंटीवारांचं सुळेंना प्रत्युत्तर
सध्या सरकारबद्दल विश्वासाची भावना नाही. मोठा प्रकल्प देतो, सांगत मोदींनी लहान मुलांसारखी समजूत काढली आहे. गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येणे अशक्य आहे. आता चर्चा बंद करून नवं काय करता येईल हे बघावं, असा सल्ला देखील शरद पवारांनी दिला. त्याचबरोबर आता रोज काहीतरी नवं उकरून काढलं जातं आहे. टिका करण्यात वेळ घालून नका. नवे प्रकल्प कसे येतील, त्याकडे लक्ष द्या. असं देखील शरद पवारांनी ठणकावून सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा
वेदांता फॉक्सकॉनचा पुण्यात होऊ घातलेला प्रकल्प अचानक गुजरातला स्थलांतरीत होत असल्याचं वृत्त मंगळवारी समोर आलं. वेदांत आणि फॉक्सकॉनच्या सेमी कंडक्ट हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
“केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार
सोबतच, गेल्या दोन वर्षात वेदांत फॉक्सकॉन कंपनीला तत्कालीन सरकारकडून जसा प्रतिसाद मिळायला हवा होता, तसा तो कदाचित मिळाला नसेल, म्हणून कंपनीकडून हा निर्णय घेतला असावा. इतकेच नव्हे तर हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Read also
- “भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका”; अशोक चव्हाण भाजपवर संतापले
- “भगवान गडावर दसरा मेळावा घेणारच, करूणा मुंडे ठाम”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा
- “अटक करावी, नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागावी”
- “याचं डोकं फक्त साखरेच्या खोक्यामध्ये अडकलं”; प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल
- “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?”खडसेंचा शिंदेंना खोचक टोला