मुंबई : वेदांता फॉक्सकॉनचा पुण्यात होऊ घातलेला प्रकल्प अचानक गुजरातला स्थलांतरीत होत असल्याचं वृत्त मंगळवारी समोर आलं. वेदांत आणि फॉक्सकॉनच्या सेमी कंडक्ट हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं आहे.
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा
एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टिका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यात अर्थ नाही. राज्याने केंद्राला सांगावं की भविष्यात जो मोठा प्रकल्प तुम्ही महाराष्ट्राला देऊ करता आहात, तो आमच्या एखाद्या अविकसित भागात द्याच. पण अगोदर पळवून नेलेला वेदांता-फॉक्सकॉन परत करा, भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका, असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
“केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार
सोबतच, गेल्या दोन वर्षात वेदांत फॉक्सकॉन कंपनीला तत्कालीन सरकारकडून जसा प्रतिसाद मिळायला हवा होता, तसा तो कदाचित मिळाला नसेल, म्हणून कंपनीकडून हा निर्णय घेतला असावा. इतकेच नव्हे तर हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
“महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार
दरम्यान, महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली.
Read also
- “भगवान गडावर दसरा मेळावा घेणारच, करूणा मुंडे ठाम”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा
- “अटक करावी, नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागावी”
- “याचं डोकं फक्त साखरेच्या खोक्यामध्ये अडकलं”; प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल
- “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?”खडसेंचा शिंदेंना खोचक टोला
- “सुप्रिया सुळेंना सत्ता गेल्याचं दु:ख झालं आहे”; सुधिर मुनगंटीवारांचं सुळेंना प्रत्युत्तर