मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसले आहेत. विधानसभेतील 40 आमदार, 12 खासदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी, आणि असंख्य कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंना पाठिंबा दिला आहे. अशातच आता देशातील विविध राज्यातील राज्य प्रमुखांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.
“तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही”; मनसे नेते संदीप देशपांडे
बुधवारी नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, मणिपुर, छत्तीसगड या राज्यांतील राज्य प्रमुखांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली. देशभरात 10 राज्यापैंकी 8 राज्यातील प्रमुखांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र ते नेते अधिकृत नसून, अधिकृत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अॅफिडेव्हिट देत आपल्यासोबत असल्याचं सांगितलं आहे. असा खुलासा ठाकरेंकडून केला जात आहे.
शिवसेना आणि निवडणुक चिन्हाबाबत सध्या शिंदे आणि ठाकरे यांची लढाई सर्वोच्च न्यायालयात आहे. येत्या 27 सप्टेंबर रोजी याबाबत सुनावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच न्यायधीशांचं खंडपीठ देखील नेमण्यात आलं आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सध्या सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. खरी शिवसेना नेमकी कुणाची ? याबाबत निकाल लागणार आहे.
“वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत”; वेदांतच्या अध्यक्षांचे स्पष्टिकरण
दरम्यान, यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, शिवसेनेच्या विविध राज्यातील प्रदेश प्रमुखांनी बुधवारी भेट घेत या सर्वांनी आम्हाला आपला पाठींबा जाहीर केला. यासमयी संपन्न झालेल्या बैठकीत शिवसेना पक्ष संघटना देशातील कानाकोपऱ्यात वाढवण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. यामध्ये दिल्ली, मणिपूर, मध्य प्रदेश,छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, हैदराबाद, गोवा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि त्रिपुरा अशा एकूण १२ राज्यातील प्रदेश प्रमुखांचा समावेश होता. या सर्व राज्य प्रमुखांना त्यांच्या राज्यात पक्षवाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याबाबत आश्वस्त केले.
Read also
- “केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार
- “महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार
- “मुख्यमंत्री असताना मोदींनी अनेक प्रकल्प घोषीत करून हजारो करोड रूपये पाण्यात घातले”
- दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर?; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधान
- “त्या वेळी बहुदा जंयत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” ; भाजप आमदाराचा टोला