कोल्हापूर : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. तर अनेक जण अजित पवार गटात दाखल झाले आहेत. मात्र कोल्हापूरात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष चंगेजखान पठाण यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पालकमंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मोदींनी मनोज जरांगे यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,” ठाकरेंची मागणी
राष्ट्रवादी कॅंग्रेसचे जनरल सेक्रेटरी, राष्ट्रवादी सेवा दलाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून चंगेजखान पठाण यांनी काम पाहिले आहे. पठाण यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर नगरपालिकेचे ते पहिले नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले होते. हाज कमिटी, मौलाना आझाद महामंडळाचे माजी संचालक अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे.
हेही वाचा…मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ गावकरी एकवटले, गावात सुरू केलं ठिय्या आंदोलन
राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी राज्यभर फिरून पक्ष मजबूत करण्याचे कार्य केले होते. राष्ट्रवादी आणि पवार यांच्याशी एकनिष्ठ असणारे पठाण यांना पक्ष वाढीसाठी कार्य करत असतांना अनेक अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका,” आणखी एका मराठा तरूणाने संपवलं जीवन
हेही वाचा…मोदींचं अजित पवारांकडून कौतूक अन् नंतर लगेचच मोदींनी शरद पवारांवर साधला निशाणा
हेही वाचा…आता सर्व महिलांना मिळणार मोफत मोबाईल, ‘या’ जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…नाशिक लोकसभा जागेसाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली, तरीही शिंदेंचा ‘हा’ उमेदवार लढणार
हेही वाचा…मोदींच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या निळवंडे धरणाचा इतिहास काय ? वाचा सविस्तर