नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह महायुतीतील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. पुढच्या निवडणुकीसाठी नाशिकच्या जागेसाठी आता महायुतीकडून ही जागा कुणाच्या वाटेला येणार ? त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. यातच या जागेसाठी भाजपकडून आता जय्यत तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड करणारा मंगेश साबळे कोण? अशी अनेक आंदोलने करण्यासाठी आहे प्रसिद्ध
मनपाचे माजी सभागृह नेते तथा भाजपचे प्रदेश सदस्य दिनकर पाटील यांनी या जागेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यांनी आजवरच्या कार्याचे प्रतिबिंबर मांडणारे वृत सेवेचं या पुस्तकाचे प्रकाशन पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात झाले. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड, मराठा क्रांती मोर्चाने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..
मागील दोन सलग लोकसभा निवडणुक जिंकून हेमंत गोडसे यांनी आपल्या उमेदवारीवर दावा सांगितला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून दिनकर पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याआधी २००९ मध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ या मतदारसंघात विजयी झाले होते. आता छगन भुजबळ देखील महायुतीत सामील झाल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला ही जागा मिळण्याची शक्यता कमी असली तरी भुजबळ यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…श्रेयवादाची लढाई सुरू..! “मोदीजी आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे”, राष्ट्रवादीने मोदींना लगावला खोचक टोला
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, देवळाली-नाशिकरोड, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यापैकी तीन मतदारसंघात भाजपचे तर तीन मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुती युतीत नाशिक लोकसभा जागा कुणाला मिळणार त्याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोदींच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या निळवंडे धरणाचा इतिहास काय ? वाचा सविस्तर
हेही वाचा…“मोदींनी मनोज जरांगे यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,” ठाकरेंची मागणी
हेही वाचा…मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ गावकरी एकवटले, गावात सुरू केलं ठिय्या आंदोलन
हेही वाचा…नरेंद्र मोदी साईनगरीत दाखल, तब्बल ७५०० कोटी रूपयांच्या विकास कामांचं होणार लोकार्पण
हेही वाचा…“हिंमत असेल तर मनोज जरांगे पाटलांना अटक करून दाखवा,” मराठा समाज आक्रमक, कुणी दिला इशारा ?