मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. आज मुंबईत वकिल गुणरत्ने सदावर्ते यांच्या वाहनांची मराठा क्रांती मोर्चेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात पार्क केलेल्या सदावर्तेंच्या वाहनांची या तरूणांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आक्रमक झालेल्या तरूणांकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मंगेश साबळे याच्यासह तिघांना अटक केली आहे. तर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात मंगेश साबळे मागील काही दिवसापासून राज्यात परिचित झाले आहेत.
हेही वाचा…“तर मोदींच्या नगरच्या सभेत एकाच वेळी ५ हजार कार्यकर्ते उभं राहून जाब विचारणार”, कुणी दिला इशारा ?
मंगेश साबळे हे संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी मंगेश साबळे मागील काही महिन्यापासून प्रसिध्द आहेत. यातच फुलंब्री पंचायत समितीसमोर पैसे उधळून आंदोलन केल्याने एकदा चर्चेत आले होते. यातच अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जच्या घटनेचा निषेध करण्यासाठी स्वत:ची कार पेटवली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा वकिल गुणरत्ने सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह फडणवीस दिल्लीला रवाना
गुणरत्ने सदावर्ते यांची तोडफोड करण्यात आलेली एक गाडी भोईवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे तोडफोडीच्या घटनेनंतर पोलीस उपायुक्तांनी सदावर्ते यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेन पवार भोईवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
वकिल गुणरत्ने सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, त्याप्रकरणी तीन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता वकिल सतीश माने-शिंदे निशुल्क वकिलपत्र घेणार असून मराठा क्रांती मोर्चेाच्या कार्यकर्त्यांकडून ते केस लढणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड, मराठा क्रांती मोर्चाने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..
हेही वाचा…श्रेयवादाची लढाई सुरू..! “मोदीजी आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे”, राष्ट्रवादीने मोदींना लगावला खोचक टोला
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा, वाहनांची तोडफोड केल्यानंतर सदावर्तेंची मागणी”
हेही वाचा…“राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा”, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी