मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वकिल गुणरत्ने सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली आहे. त्यानंतर गुणरत्ने सदावर्ते आक्रमक झाले असून मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारला कडक इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे गटाची उद्या सत्व परिक्षा, नार्वेकर उद्या मोठा निर्णय घेणार ?
हिमंत असेल तर मनोज जरांगे पाटलांना अटक करून दाखवा. सर्व मराठा समाज क्रांती ठोक मोर्चा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे. शांततेत आंदोलन चालू असताना मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सदावर्ते आणि भुजबळांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी देखील मराठा क्रांती ठोक मोर्चाने सरकारकडे केली आहे.
हेही वाचा…“तर मोदींच्या नगरच्या सभेत एकाच वेळी ५ हजार कार्यकर्ते उभं राहून जाब विचारणार”, कुणी दिला इशारा ?
आज सकाळी गुणरत्ने सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, याचे आम्ही समर्थन करत नाही. ज्या कार्यकर्त्यांनी तो हल्ला केला ते मराठा क्रांती मोर्चा मुंबईमधील नाहीत. जर ते तरूण मराठा तरूण असतील आणि त्यांनी भावनेच्या भरात केलेलं हे कृत्य असेल तर त्यांच्या भावनांचा आदर करत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. असं मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक अमोल जाधवराव यांनी सांगितले आहे.
गुणरत्ने सदावर्ते यांची तोडफोड करण्यात आलेली एक गाडी भोईवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे तोडफोडीच्या घटनेनंतर पोलीस उपायुक्तांनी सदावर्ते यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेन पवार भोईवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह फडणवीस दिल्लीला रवाना
वकिल गुणरत्ने सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, त्याप्रकरणी तीन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता वकिल सतीश माने-शिंदे निशुल्क वकिलपत्र घेणार असून मराठा क्रांती मोर्चेाच्या कार्यकर्त्यांकडून ते केस लढणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड करणारा मंगेश साबळे कोण? अशी अनेक आंदोलने करण्यासाठी आहे प्रसिद्ध
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड, मराठा क्रांती मोर्चाने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..
हेही वाचा…श्रेयवादाची लढाई सुरू..! “मोदीजी आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे”, राष्ट्रवादीने मोदींना लगावला खोचक टोला
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा, वाहनांची तोडफोड केल्यानंतर सदावर्तेंची मागणी”
हेही वाचा…“राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा”, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी