रायगड : रायगड पोलिस दलातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना विशेष नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.
हेही वाचा…“हिंमत असेल तर मनोज जरांगे पाटलांना अटक करून दाखवा,” मराठा समाज आक्रमक, कुणी दिला इशारा ?
जिल्ह्यातील महिला बचत गटाचे काम सांभाळणाऱ्या सर्व महिलांना जिल्हा नियोजन विकास निधीतून मोबाईल फोन दिले जातील. पुढील दोन महिन्यांत या मोबाईल फोनचे वितरण केले जाईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड करणारा मंगेश साबळे कोण? अशी अनेक आंदोलने करण्यासाठी आहे प्रसिद्ध
दरम्यान, आज महिलांना सक्षम करण्यासाठी आज अनेक योजना कार्यरत आहे. पण त्याची माहिती त्यांना नसते त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी राहते ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं.
रायगड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने बुधवारी ‘नवदुर्गा सन्मान सोहळा 2023’ हा पुरस्कार वितरण समारंभ नागोठणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास पालकमंत्री मा. ना. उदय सामंत यांच्यासह उपस्थित होते. सामाजिक, शासकीय, पोलीस, वैद्यकीय क्षेत्रांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 18… pic.twitter.com/tpGb0rmxiG
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…नाशिक लोकसभा जागेसाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली, तरीही शिंदेंचा ‘हा’ उमेदवार लढणार
हेही वाचा…मोदींच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या निळवंडे धरणाचा इतिहास काय ? वाचा सविस्तर
हेही वाचा…“मोदींनी मनोज जरांगे यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,” ठाकरेंची मागणी
हेही वाचा…मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ गावकरी एकवटले, गावात सुरू केलं ठिय्या आंदोलन
हेही वाचा…नरेंद्र मोदी साईनगरीत दाखल, तब्बल ७५०० कोटी रूपयांच्या विकास कामांचं होणार लोकार्पण