अहमदनगर : महाराष्ट्रातील एक नेते देशात कृषीमंत्री असतांना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. कृषीमंत्री असतांना शेतकऱ्यांना एमएसपी चे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी अडचण येत होती. त्यांचा वैयक्तितरित्या सन्मान करतो. परंतु त्यांच्या काळात शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही. अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली आहे. विशेष करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील व्यासपीठावर असल्याने याची चर्चा जोरदार सुरू आहे.
हेही वाचा…नरेंद्र मोदी साईनगरीत दाखल, तब्बल ७५०० कोटी रूपयांच्या विकास कामांचं होणार लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिर्डी येथे विविध विकास कामांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथील मंदिरात जाऊन साईबाबाचं दर्शन घेऊन त्यांची आरती केली. त्यानंतर शेतकरी महासन्मान योजनाबाबत बोलतांना शरद पवारांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
विशेष म्हणजे या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतूक केलं. नरेंद्र मोदी यांच्यामुळे लोककल्याणाचं काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. विकासासाठी आम्ही मोदींसोबत आहोत. असं अजित पवारांनी म्हटलं. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली. त्यावेळी अजित पवार मान खाली करून सर्व ऐकत होते. हे सर्व व्हिडीओमधून दिसून आले. त्यामुळे याची चर्चा आता राज्यात सुरू आहे.
हेही वाचा…“हिंमत असेल तर मनोज जरांगे पाटलांना अटक करून दाखवा,” मराठा समाज आक्रमक, कुणी दिला इशारा ?
दरम्यान, २०१४ पुर्वी अनेक आकडे तुम्हाला ऐकायला मिळत होते. ते आकडे भ्रष्टाचाराचे होते. परंतु आता जे आकडे मी सांगतो, ते गरिबांसाठी तयार केलेल्या योजनांचे आहे. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली. यामुळे राज्यातील लहान शेतकऱ्यांना सन्मान निधीचे १२ हजार रूपये मिळणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…आता सर्व महिलांना मिळणार मोफत मोबाईल, ‘या’ जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…नाशिक लोकसभा जागेसाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली, तरीही शिंदेंचा ‘हा’ उमेदवार लढणार
हेही वाचा…मोदींच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या निळवंडे धरणाचा इतिहास काय ? वाचा सविस्तर
हेही वाचा…“मोदींनी मनोज जरांगे यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,” ठाकरेंची मागणी
हेही वाचा…मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ गावकरी एकवटले, गावात सुरू केलं ठिय्या आंदोलन