मुंबई : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात असल्याने विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर काल आयटी मंत्री राजीवर चंद्रशेखर यांनी महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मंजूरी देण्याची घोषणा केली. यामधून महाराष्ट्रात 2000 कोटींची गुंतवणुक तर 5000 रोजगार निर्मिती होणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टोला हाणला आहे.
12,000,00,00,000…! या आकड्याची आता CAG कडून चौकशी: चित्रा वाघ यांनी सेनेला डिवचलं
महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय इलेक्टॉनिक्स धोरणातंर्गत महाराष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2000 कोटींची भेट म्हणून गुंतवणुक दिली आहे. यामधून 5000 रोजगार निर्मिती होणार आहे. असं फडणवीस म्हणाले होते. तसेच काही नेते आणि एचएमव्ही पत्रकार महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझा प्रश्न आहे, ज्यांनी रिफायनरीला विरोध केला. त्यांना गुंतवणुकीवर बोलण्याचा काय अधिकार? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला.
“काळजी करू नका..! मोदींनी महाराष्ट्राला 2000 कोटींची भेट दिली”; देवेंद्र फडणवीस
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काल 2000 कोटीची गुंतवणुक असणारा प्रोजेक्ट महाराष्ट्राला दिल्याबद्दल केंद्राचे आभार व्यक्त केले. वेंदाता फॉक्सकॉन महाराष्ट्राची गुंतवणुक 1 लाख 58 हजार कोटी तर टाटा एअरबस ची गुंतवणुक 22 हजार कोटी म्हणजे 1 लाख 80 हजार कोटी रोजगार निर्माण होतील. असं म्हणत एवढी गुंतवणुक महाराष्ट्रासाठी होणार होती. ती गुजरातला नेली आणि त्याबद्दल 2000 कोटीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात घेतला. म्हणजे लंगोट घेऊन अंगातील कपडे देण्याचा प्रकार असा खोटक टोला अमोल मिटकरींनी फडणवीसांना लगावला.
“प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो? पंतप्रधानांचा विचार विशाल असायला हवं”; राज ठाकरे
दरम्यान फॉक्सकॉनबाबत चूकीचा प्रचार केला गेला. मग तत्कालिन उद्योग मंत्री सुभाष देसाी यांनी महाराष्ट्रात फॉक्सकॉन येणार नाही, असे का सांगितले होते. टाटा एअरबस प्रकल्प 2021 मध्ये गुजरातमध्ये नियोजित झाला. पण खापर आमच्यावर फोडले जात आहे. विरोधी पक्षनेता असताना मी स्वत : टाटांशी संबंधित व्यक्तींना माझ्या घरी बोलाविले. पण त्यांनी सांगितले की त्यावेळी महाराष्ट्रातील वातावरण उचित नाही. असंही फडणवीसांनी म्हटलं होतं.
Read also
- “आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे, बालिश बहू बडबडला ;” शीतल म्हात्रे
- “गुवाहाटीवरून तर फडणवीसांनी बच्चू भाऊंचे अंतर्वस्त्रच काढले”; राष्ट्रवादीने डिवचलं
- आंदोलकांचा फडणवीसांकडून ‘शेंबडी पोरं’ म्हणून उल्लेख..! आदित्य ठाकरे म्हणाले….
- फडणवीसांनी कागदपत्रासह पुरावे दाखविले; ठाकरेंनी थेट ‘वन टू वन’ करण्याचं दिले आव्हान
- “माजले होते बोके, कोरोनात खाऊन खोके, आता होणार चौकशी ओके”; शेलारांचा टोला