IMPIMP
Those screams were so loud that the village was shaken Those screams were so loud that the village was shaken

“त्या” किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरलं होतं”, जरांगे पाटलांनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी

मुंबई : महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांसाठी ओबीसीतूनच आरक्षण घेणार  असं आम्ही ठरवलं आहे. आमचा जीव गेला तरीही मुंबईचं आंदोलन होणारच आहे. अंतरवाली-सराटीत झालेल्या लाठीचार्जमध्ये हात-पाय मोडले गेले. मी ते काहीही विसरलो नाही. त्या किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरलं  होतं. पण आता गाव त्याच ताकदीने पेटून उठलं आहे. जे रक्त सांडलं त्याचं बळ निर्माण झालं आहे. तो विषय काढण्यासारखा नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टिका केलीय.

हेही वाचा..“पुर्वी मंबाजी, तुंबाजी होते, आताच्या काळात मिटकरी आहेत”, शरद पवार गटाने मिटकरींना डिवचलं 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे २० जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कुच करणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत. यावेळी मुंबईत हजारो ट्रॅक्टर सोबत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचामहायुतीत जागांचा पेच वाढला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ‘या’ जागांवर दावा सांगितला 

दरम्यान, अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलक तसेच पोलिसांमध्ये झालेल्या झटपटीमध्ये अनेकांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक जखमी झाले होते. यावरून जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलाय.

READ ALSO :

हेही वाचा..“दादांसोबत नाही म्हणून आता सुप्रिया सुळेंना बारामतीत तळ ठोकावा लागतोय”, रूपाली चाकणकरांनी सुळेंना डिवचलं 

हेही वाचालहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त संगीतमय भव्य भजन स्पर्धा ; पुणेकरांना अनुभवायला मिळणार ‘याची देही याची डोळा’ 

हेही वाचा…हे तीन चेहरे डोक्यात साठवून ठेवा.! IIT BHU मधील सामूहिक ब’ला’त्का’र प्रकरण, तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे सदस्य 

हेही वाचा.रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवर भाजपचा डोळा ; भाजप ‘या’ कॅबिनेट मंत्र्याला मैदानात उतरवण्याच्या तयारीत 

हेही वाचा..राष्ट्रवादीतल्या सासऱ्यावर भाजपमधील सून भारी पडणार का? ; ‘या’ लोकसभा मतदारसंघात निवडणूक गाजणार