पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आता दोन्ही गटांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. यातच विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या देखील सुरू झाल्या आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पडलेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी देखील हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरून आता अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार टोला लगावला आहे.
हेही वाचा…महायुतीत गर्दी वाढली, उमेदवारांची आशा माळवली, विदर्भाचा भाजपचा बडा नेता कॉंग्रेसच्या वाटेवर ?
अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कालवा सल्लागार समितीची पाणीविषयक बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीसाठी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली तर बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यातील यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा यांची नितांत गजर आहे. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर नाकाने कांदे सोलणाऱ्यांनो तुमचे आमच्या दादांशिवाय पान हालत नाही. कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील, असा टोला चाकणकरांनी सुळेंना लगावला.
हेही वाचा…मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं ठरलंय, ‘हा’ उमेदवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान, या बैठकी दरम्यान, रोहित पवार यांनी देखील अजितदादांचे आभार मानले आहेत. सध्याची दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहता कुकडी प्रकल्पातून १ मार्चपासून पाणी सोडण्याच्या पाठपुराव्याला यश आले असून उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पातून १ मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्जत तालुक्यातील ५४ गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची अडचण दुर होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबाबत अजिदादा यांचे माझ्या मतदारसंघाच्या वतीने आभार असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
नाकाने कांदे सोलणाऱ्यांनो तुमचे आमच्या दादांशिवाय पान हालत नाही..
कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील.. pic.twitter.com/nBWxpSNVfP— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 24, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींविरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा अन् मगच…”राज्याच्या मंत्र्याने इंडिया आघाडीला दिलं आव्हान
हेही वाचाजरांगेंवर गंभीर आरोप, मराठा समाज आक्रमक, अजय बारस्कर महाराजांवर हल्ला
हेही वाचा..राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, भाजपने नार्वेकरांसाठी निश्चित केला ‘हा’ मतदारसंघ
हेही वाचालोकसभेसाठी महाविकास आघाडीत ‘या’ जागांवर खरी रस्सीखेच, वाचा सविस्तर
हेही वाचा…श्रीरंग बारणेंचा पाय आणखी खोलात, राष्ट्रवादीनंतर आता मावळवर भाजपनेही ठोकला दावा