पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाबाबत पोलिस तपासात आता दिवसेंदिवस धक्कादायक माहिती उघड होत आहे. यातच पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात ललित पाटील ससून रूग्णालयात राहण्यासाठी महिन्याला १७ लाख रूपये देत होता. मात्र हे १७ लाख नेमका कुणाला द्यायचा? याची माहिती अद्यापही समोर आली नसून पोलिस तपास करीत आहे. यावरून काॅंग्रेसने देखील हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“अधर्माविरूद्ध धर्माची लढाई”, राष्ट्रवादी निवडणुक आयोग सुनावणी प्रकरण
ललित पाटील येरवडा तुरूंगातून ससून रूग्णालयात वार्ड क्रमांक १६ मध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा पोलिस तपासात झाला असून यातच आता रूग्णालयात राहण्यासाठी महिन्याला १७ लाख रूपये ललित पाटील ससून रूग्णालयाला देत होता. हे पैसे ललित पाटील नेमका कुणाला द्यायचा? याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी पोलीस तपासात आज ना उद्या समोर येणार आहे. त्यामुळे या गोष्टींकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात राजकीय नेत्यांचा हात आहे की नाही? पोलिस महासंचालकांनी दिली मोठी माहिती
दरम्यान, अपयशी गृहमंत्र्यांच्या सत्ताकाळात एका कुख्यात ड्रग्ज माफियाला कशी व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात होती. एक अट्टल गुन्हेगार १७ लाख रूपये देऊन ऐशोआरामात वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली सरकारी रूग्णालयात राहत होता. सरकारमधील कोणीतरी रसद पुरवल्याशिवाय हे होऊ शकतं का ? असा सवाल काॅंग्रेसने केला आहे. तसेच दिल्ली दरबारी जाऊन मुजरा करण्यात वेळ घालवणारे निष्क्रिय गृहमंत्री याची सखोल चौकशी करणार का ? असा खोचक सवाल देखील काॅंग्रेसने केला आहे.
अपयशी गृहमंत्र्याच्या सत्ताकाळात एका कुख्यात ड्रग्ज माफियाला कशी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात होती बघा… एक अट्टल गुन्हेगार 17 लाख रुपये देऊन ऐशोरामात वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली सरकारी रुग्णालयात राहत होता. सरकारमधील कोणीतरी रसद पुरवल्याशिवाय हे होऊ शकतं का? दिल्लीदरबारी जाऊन… pic.twitter.com/9CQfKsngMH
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 10, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अंतिम शब्द शरद पवारांचा की अजित पवारांचा,” दिलीप वळसे पाटील म्हणाले…
हेही वाचा…“आत्ताही शरद पवारांचंच मार्गदर्शन,” शरद पवारांच्या भेटीवर ‘दिलीप वळसे पाटलां’चं मोठं विधान
हेही वाचा…उद्धव ठाकरे अडचणीत ? सुप्रिम कोर्टात ‘या’ प्रकरणाबाबत ठाकरेंच्याविरोधात अवमान याचिका दाखल
हेही वाचा…अजित पवार गटातील अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता पोहचला शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंनी दिवाळीत केला डबल धमाका,” राज्य सरकारवर साधला निशाणा